
गोव्याच्या जनतेने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून भाजपला निवडून दिले, आणि आज गोव्यात डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाशी शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची विशेष उपस्थिती होती, त्याच बरोबर विविध भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील यावेळी उपस्थित होते. भाजपकडून गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना नियुक्त करण्यात आलं होतं. यावेळी त्यांची देखील विशेष उपस्थिती होती. फडणवीस यांनी डॉ. प्रमोद सावंत यांनी दुसऱ्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या निमित्त त्यांचे अभिनंदन केले आहे. याच बरोबर ‘गोल्डन गोवा’ या दिशेने भाजपची वाटचाल पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
‘मला विश्वास आहे कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळातील सर्व मंत्री स्वत:ला झोकून देऊन काम करतील’ अशा भावना यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. नुकते उत्तरप्रदेश येथे देखील योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. यात प्रमाणे आज गोवा येथे देखील शपथविधी पार पडला.
भारतीय जनता पक्षासाठी हा एक अविस्मरणीय क्षण ठरला. गोव्यासह आता 16 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार आहे. बहुतांश ठिकाणी बहुमतात भाजपने सरकार स्थापन केले आहे, तर काही राज्यांमध्ये युतीत भाजपचे सरकार आहे.
गोव्यात मुख्यमंत्रीपदावरुन रच्चीखेच सुरु असल्याचं यापूर्वी अनेकदा बोललं गेलं. गोव्याच्या राजकारणात त्यामुळे एकदा चढाओढही पाहायला मिळाली होती. याआधीच विश्वजीत राणे आणि प्रमोद सावंत यांच्यातील स्पर्धाही अनेकदा चर्चिली गेलेलीय. अशातच निवडणुकीतील विजयानंतर विश्वजीत राणेंनी मतदारांचे आभार मानताना जाहिरातही प्रसिद्ध केली होती. मात्र या जाहिरातीमध्ये प्रमोद सावंत यांचा फोटो कुठेच दिसून आला नव्हता. मात्र, प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्यानं अखेर मुख्यमंत्रीपदी सुरू असलेली रस्सीखेच थांबली.आणि आज अखेर प्रमोद सावंत यांचा शपथविधी देखील पार पडला.
गोव्यात भाजपने एकूण 20 जागांवर यश मिळवले आहे. त्यामुळे भारताचे एकहाती सरकार गोव्यात स्थापन झाले आहे.
