
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेऊन 8 वर्षे पूर्ण झाली. आजच्याच दिवशी 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी’ या शब्दांच्या जयघोषात भारताचे पंतप्रधान पद स्वीकारले आणि भारताच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली. ही सुरुवात होती नवीन भारताची. एका राज्याचे मुख्यमंत्री पद 13 वर्षे समर्थपणे भुषवल्यानंतर त्यांची देशाची बागडोर आपल्या हातात घेतली आणि आपल्या या भारत देशाची वाटचाल एका नवीन यशाकडे सुरु झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या कार्यकालाचे 8 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटर खात्याच्या माध्यमातून ते म्हणतात कि, “भारताला आधुनिक नवभारताचे रूप देणारे, देशाला शक्तिशाली आणि गतिशील बनवणारे, नेतृत्वाच्या व्याख्या नव्याने लिहीणारे, जनसामान्यांसाठी कठओर परिश्रमाने कार्यरत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूप खूप शुभेच्छा.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यावर देशात अनेक सकारात्मक बदल घडले आहेत. आपल्या देशाचे महत्व आणि नाव जागतिक पटलावर तर उंचावलेच आहे, सोबतच भारत आता एक आर्थिक आणि वैश्विक महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. केवळ एवढेच नाही, तर अनेक वर्षांपासून रखडलेल्या काश्मीरच्या कलम 370 आणि 35 ‘अ’ सह, राममंदिराचा प्रश्न देखील पंतप्रधान मोदींच्याच काळात सुटला. कोव्हिडच्या परिस्थितीशी दोन हात करत केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम चालवली आणि इतर समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या देशांपेक्षा भारताने कोरोनाची स्थिती नक्कीच चांगल्यापणे हाताळली.
काश्मीरच्या प्रश्नापासून ते तीन तलाक पर्यंत, तर राममंदिराच्या प्रश्नापासून आता काशीविश्वनाथ पर्यंत अनेक वर्षांपासून मुद्दाम दाबून टाकण्यात आलेल्या आपल्या संस्कृतिला पुन्हा एकदा जगासमोर आणण्याचे काम मोदी सरकार करत आहे. आता आपल्या देशात दहशहतवाद्यांना देखील सर्जिकल स्ट्राइकची भिती मोदी सरकारने घातली आहे. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइकच्या माध्यमातून दहशतवादी आणि दहशतवाद समर्थक देशांना भारताने चांगलाल मोठा संदेश दिला आहे.
एकूणच गेल्या 8 वर्षात नवीन भारताची झलक आपल्याला मिळाली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
