
कोरोनाच्या रुग्ण संख्यांमध्ये पुन्हा एकदा लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. नुकतेच महाराष्ट्रात अचानक कोरोना रुग्णांची वाढ झाली असल्याची समोर आली आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेत अनेक लोक कोरोनाग्रस्त होत असताना दिसून येत आहेत. त्यातून आपले नेते मंडळी सुद्धा वाचलेले नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटर खात्यावरुन माहिती देत सांगितले आहे कि, त्यांची कोव्हिड चाचणी पॉजिटिव्ह आली आहे, आणि त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी कोव्हिड चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे.
या आधी देखील फडणवीस यांना २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. यावेळी मात्र सध्या ते होम आयसोलेशन मध्ये आहेत. त्यांनी तापाची लक्षणं दिसल्यावरच पुढचे सगळे दौरे रद्द करत स्वत:ला आयसोलेट केले असल्याचे समोर आले आहे. लक्षणं दिसण्याआधी दोन दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी मोठा लातूर दौरा केला, ज्यासाठी त्यांनी रेल्वेनी देखील प्रवास केला होता. लातूर येथे मोठी सभा देखील आयोजित करण्यात आली होती.
मात्र आता लक्षणं दिसल्यास त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना स्वत:ची कोरोना चाचणी करण्याची तसेच काळजी घेण्याची विनंती केली आहे.
मुंबई येथे शनिवारी ८८९ नवीन करोना रुग्ण आधळले या आधी सलग तीन दिवसांपर्यंत ७०० हून अधिक कोरोना केस समोर येत होते. ज्यापैकी ९५% रुग्ण यांना लक्षण दिसून आलेले नाहीत. ही काय ती दिलासा देणारी बाब आहे. मात्र पुन्हा एकदा वाढत्या कोरोना रुग्णांमुळे एकूणच महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
