महाराष्ट्राचे मध्यप्रदेश होणार का ? जनतेचा प्रश्न…!


महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय नाट्यात रोज वेगवेगळी वळणे येत आहेत. मात्र सगळ्याचा मूळ प्रश्न एकच. कि शिवसेनेसारख्या इतक्या मोठ्या पक्षात अशी फूट का पडावी? राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आधीच कितीतरी वेळा वेगवेगळ्या माध्यमांद्वारे स्पष्ट केले आहे कि भाजपला ही सत्ता पाडण्यासाठी काहीच करावे लागणार नाही, ही सत्ता आंतरिक विरोधातून पडेल, आणि आता तसेच होताना दिसून येत आहे.

शिवसेनेचे इतक्या मोठ्या संख्येतील आमदार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होऊन एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. माहारष्ट्रात आता मध्यप्रदेशासारखे तर होणार नाही ना ? असा प्रश्न पडला आहे. तिथे ज्योतिरादित्य सिंधिया होते, तर इथे एकनाथ शिंदे आहेत. तिथे काँग्रेस होती, तर इथे शिवराजसिंह चौहान होते, इथे देवेंद्र फडणवीस आहेत. महाराष्ट्रात आता सत्तांतर होणार का ? होईल तर कधी होईल असे अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात कोंडले आहेत.

https://twitter.com/vikasbal_Bjym/status/1540382839522205697



या संपूर्ण नाट्यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अप्रोचेबल नसणे. मुख्यमंत्री हा एक्सेसेबल असला पाहिजे, हा अप्रोचेबल असला पाहिजे. त्याच्या पर्यंत कमीत कमी त्याच्या आमदारांना तरी पोहोचता आले पाहिजे. मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील अनेक आमदारांकडून आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्याच आमदारांना आणि कार्यकर्त्यांना भेटणे अशक्य झाले होते. त्यांना सतत त्यांच्या बंगल्यावर किंवा त्यांच्या कार्यालयात तासंतास बसवण्यात यायचे मात्र मुख्यमंत्री भेटायचेच नाही. हे अतिशय भयंकर आहे. कुठल्याही सरकारसाठी. मुख्यमंत्र्यांच्या आसपास राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोक अधिक असायचे. मुख्यमंत्री विधान भवनात खूप कमी दिसायचे. असे सगळे असताना, आपल्याच मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्यालाच पोहोचता येत नाहीये, हे किती भीषण. हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना प्रमुखांनी केलेली तडजोड, ज्या लोकांना जनतेने लाथाडले, त्यांच्यासोबत केलेली आघाडी आणि स्थापन केलेले सरकार, त्यानंतर महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांनी घातलेला हैदोस, हे सर्वच आज शिवसेनेला भारी पडतयं.

मुख्यमंत्र्यांनी आपल्याच लोकांना दिलेल्या या अपमानास्पद वागणुकीचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील शिवसेनेची सद्य स्थिती. शिवसेनेला महाराष्ट्रात आघाडी सरकार टिकवून ठेवणे अतिशय कठीण झाले आहे. शिवसेना आघाडी तोडायला ही तयार झाले आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी मोठी सुनावणी आहे, त्यामुळे या संदर्भात पुढे काय होते, हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.