महाराष्ट्राच्या जनतेला नवीन सरकारने दिला दिलासा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात…!

महाराष्ट्राची जनता महागाईने त्रस्त झालेली असताना, या नवीन सरकारने जनतेसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले कि पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे. पेट्रोल ५ रुपये तर डिझेल ३ रुपये या दराने स्वस्त झाले असल्या मुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या एका मोठ्या निर्णयासह शिंदे – फडणवीस सरकारने आणखी काही मोठे निर्णय घेतले आहेत.



१. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान :

जे शेतकरी नियमित कर्ज फडत आहेत, त्यांना सरकारतर्फे ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.  नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचं अनुदान देण्याची मागणी काही लोकप्रतिनिधींनी केली होती. तसेच शेतकऱ्यांनी देखील ही मागणी केली होती. लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

२. नगराध्यक्ष आणि सरपंचांची थेट निवडणूक :

आता नगराध्यक्ष आणि सरपंच यांची थेट जनतेद्वारे निवड होणार असल्याचे देखील या पत्रकार परिषदेत जारी करण्यात आले.

३. अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढवणार

४. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1969 मधील कलम 43 मध्ये सुधारणा. (ग्रामविकास विभाग)

५. बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सुधारणा (पणन विभाग)

६. आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करण्याची (दिनांक 31 जुलै, 2020 रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार (सामान्य प्रशासन विभाग)

नवीन सरकार स्थापन झाल्या झाल्या सरकार नागरिकांच्या हितासाठी कार्यास लागले आहे. आता पुढे काय होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.