प्रत्येकाच आई वडीलांना वाटत असतं, कि त्यांच्या मुलांनी काहीतरी मोठी कामगिरी करावी, समाजात आपले आणि आपल्या राज्याचे, पक्षी देशाचे नाव मोठे करावे. हे सुख मुंबईच्या शाह कुटुंबियांना मिळाले आहे. नुकतेच CA च्या परीक्षेचे निकाल लागले असून मुंबईच्या मीत शाह ने या परीक्षेत बाजी मारली आहे. आणि देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

सीएची अंतिम परीक्षा 14 ते 29 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली. ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. ही परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली. विद्यार्थ्यांना हा निकाल अधिकृत वेबसाइट्सवर जाऊन सहज तपासता येणार आहे. या परीक्षेत मुंबईच्या मित शाहने बाजी मारत देशात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
देशात मीतने राज्याचे नाव उंचावर एक नवीन उदाहरण प्रस्तुत केले आहे, केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला त्याचा अभिमान आहे.
असा बघू शकता निकाल :
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी सीएची परीक्षा दिली आहे, आणि निकाल जाणून घ्यायचा आहे तर पुढील पद्धतीने तुम्ही निकाल बघू शकता.
1: सर्वप्रथम icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
2: त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या “ICAI CA MAY 2022 RESULT” या लिंकवर क्लिक करा.
3: आता रोल नंबरसह तुमचा नोंदणी क्रमांक किंवा पिन सबमिट करा.
4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
5: आता तुमचा निकाल तपासा.
6 : यानंतर निकाल डाउनलोड करा
7: शेवटी, उमेदवारांनी पुढील गरजेसाठी निकालाची हार्ड कॉपी त्यांच्याकडे ठेवावी.
