
मध्यप्रदेशच्या इंदौर हून जळगावकडे निघालेली बस आज नदीत कोसळ्याने भीषण अपघात झाला आहे. आता पर्यंत एकूण १३ नागरिकांचा मृत्यु या अपघातात झाला आहे. मध्यप्रदेशच्या धार येथे हा भीषण अपघात झाला. बस नर्मदा नदीत कोसळल्याने १३ नागरिक मृत्युमुखी पडले तर १२-१५ नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. अपघात ग्रस्त एसटी बसला क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. बसची अवस्था बघता उपस्थित वागरिकांचा जीव ओठाशी आला.
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही जळगावमधील अमळनेर येथे येणार होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसटीचे अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती चन्ने यांनी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट करत आपले दु:ख व्यक्त केले आहे, तसेच ते धारच्या जिल्हाधिकारी आणि एकसी बस प्रशानाच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बचाव कार्य सुरु असल्याची माहिती देखील त्यांनी या ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.
नेमकी काय आहे घटना :
ही बस महाराष्ट्र सरकारची बस होती, सकाळी 7च्या सुमारास इंदूरवरुन जळगावकडे ही बस निघाली. इंदूरमध्ये 12 प्रवासी चढले. त्यानंतर ही बस नर्मदा नदीवरील ब्रिजवरुन खाली कोसळली. आतापर्यंत 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या बसमध्ये 50 ते 55 प्रवासी होते, अशी माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
