अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर, ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली. यासंबंधी बोलताना भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. सुरवातीला बोलताना त्यांनी मुरजी पटेल यांना समर्थन देत, “लोकांमध्ये 24 तास काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपाने उमेदवारी दिली. ही गर्दी म्हणजे आमच्या मुरजी भाईंच्या कामाची पोहोचपावती आहे. मला विश्वास आहे की जसं आता वातावरण आहे तसंच निवडणूक झाल्यावरही दिसेल.” असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना राणेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, “ना स्वत:चा पक्ष वाचवता आला, ना चिन्ह वाचवता आलं. वडिलांच्या आजारावेळी आदित्य ठाकरे बाहेरगावी पार्ट्या करत होते. एकदा प्रवासादरम्यान स्वत: रमेश लटके यांनी मला त्यांना किती मानसिक त्रास सुरू आहे हे सांगितलं. त्यांचे फोन मातोश्रीवर उचलण्यात येत नव्हते. या सर्व गोष्टी बाहेर निघाल्यानंतर सहानुभूती कोणाला मिळते ते पाहू. ” असा खुलासा राणेंनी केला.
राणे यांच्या या वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे, आणि एकूणच असे आंतरिक वाद चव्हाट्यावर आल्यामुळे ठाकरे गटाला मात्र याचा त्रास होणार असे चित्र दिसून येत आहे.
एकूणच या राजकीय चकमकीत अंधेरी पोटनिवडणूत विजय कोणाचा होणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
