बडनेरा : काेवळ्या वयातील मुलींना जाळ्यात ओढून लव्ह जिहाद प्रकरणी दोघांना पोलिसांनी पकडले आहे. दोन अल्पवयीन मुलींना फसवण्याचे कारस्थान उघडकीस आले आहे.

भोळ्या भाबड्या, गरीब आणि निरागस मुलींना जाळ्यात ओढून त्यांची लव जिहाद प्रकरणी फसवणूक करणाऱ्याना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. बडनेरा नव्या वस्तीत शिक्षक कॉलनीच्या बगिच्यात जुनेद चौधरी व अलीम सलीम नौरगाबादी यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
राजरोसपणे सुरू असलेल्या या दुष्कृत्यास लोकांनी आक्षेप घेतला. अनेक तरुण जमा झाले. पोलिसांनी या दोघाविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा३५४(D),सह १२,३५४ असे गुन्हे दाखल केले आहे.
