पुणे : काॅंग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरी टीका केली आहे. यासाठी सावरकरांनी लिहिलेल्या पत्रातील शेवटच्या वाक्याचा संदर्भ दिला आहे. मात्र, राहुल गांधी यांनी गांधीजींच्या पत्रांचाही अभ्यास करावा. इंग्रजी राजवटीच्या काळात पत्राचा शेवट त्याच पध्दतीने करण्याची प्रथा हाेती हे त्यांच्या लक्षात येईल, अशी टीका केली जात आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सावरकरांचे एक पत्र दाखविले हाेते. सावकरकर यांनी इंग्रजांना पत्र लिहिले असून त्यातील शेवटची ओळ आहे, ‘‘मी तुमचा आज्ञाधारी सेवक म्हणून राहीन..’’ असे म्हणत हे पत्र म्हणजे त्यांचा माफीनामा हाेता असे त्यांनी म्हटले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना हे पाहायचे असेल तर पहावे असेही ते म्हणाले होते.
मात्र, फडणवीस यांच्या ऐवजी राहूल गांधींना अभ्यासकांनीच उत्तर दिले आहे. इंग्रजी राजवटीत पत्राचा शेवट करण्याची ही पध्दतच हाेती, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. महात्मा गांधी यांनी लाॅर्ड चेम्सफाेर्डला दिलेल्या पत्राचाही हवाला देण्यात आला आहे. हे पत्र गांधीजींनी असहकार आंदाेलनाचे अल्मीटेम म्हणून दिले आहे. मात्र, त्याचाही शेवट करताना गांधीजींनी म्हटले आहे की, आय हॅव द ऑनर टू रिमेन यूवर एक्सेलन्सीज ओबिडियंट सर्व्हंट. आय बेग टू रिमेन यूवर राॅयल हायनेस फेथफुल सर्व्हंट. याचा अर्थ तुमच्या राॅयल हायनेस यांचा कायम विश्वासू सेवक राहण्याचा सन्मान मला मिळाला आहे. मी कायम विश्वासू सेवक राहाे अशी प्रार्थना आपल्या राॅयल हायनेस यांच्याकडे करताे.
महात्मा गांधी यांनी 22 जून 1920 राेजी हे पत्र लिहिले आहे. त्यावेळी ते तुरुंगातही नव्हते. तरीही ही भाषा वापरली आहे. मग अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भाेगत असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यावेळची प्रथा साेडून कशी भाषा वापरायची हाेती, असा सवालही करण्यात येत आहे.
