अण्णा हजारे अजित पवार यांच्या विरोधात न्यायालयात, शिखर बॅंक घाेटाळ्याची पुन्हा हाेणार चाैकशी

मुंबई : सामाजिक कार्यकर्ता अण्णा हजारे यांनी विराेधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटींचा घोटाळा प्रकरणाची उद्या (शुक्रवार) मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी हाेणार आहे. या प्रकरणात क्लाजर रिपाेर्ट सादर करून पवारांसह संचालकांना क्लिन चिट देण्यात आली हाेती. मात्र, आता मुंबइ पाेलीसांची आर्थिक गुन्हे शाखा पुन्हा चाैकशी करणार आहे.



शिखर बॅंकेच्या सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता. २०११मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते.

अजित पवार यांच्यासह तत्कालीन संचालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. यासंदर्भात स्थापन केलेल्या एसआयटीने पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेवरील ७५ जणांना क्लीन चिट दिली होती. मुंबईच्या सत्र न्यायालयात काही दिवसांपूर्वीच क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. सहकार विभागाच्या अहवालातही पवारांसह बहुतांश संचालकांना क्लीन चिट मिळाली आहे. मात्र आता अण्णा हजारे न्यायालयात गेल्याने अजित पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत. वरिष्ठ वकील सतीश तळेकर अण्णा हजारेंची बाजू मांडणार आहेत.