महाविकास आघाडी सरकारने लक्ष दिले असते तर वाचला असता श्रद्धाचा जीव..

मुंबईः महाविकास आघाडी सरकारच्या काळात लक्ष दिले असते तर श्रध्दा वालकरचा जीव वाचला असता. कारण दाेन वर्षांपूर्वीच श्रध्दाने वसई पाेलीसांत आफताबकडून मारहाण हाेते, तुकडे तुकडे करून फेकून देण्याची धमकी ताे देताे, अशी तक्रार केली हाेती. मात्र, पाेलीसांनी या तक्रारीकडे दूर्लक्ष केले.



 श्रद्धाने नोव्हेंबर २०२०मध्ये आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. श्रद्धाने तक्रारीत आफताबापासून जीवाला धोका आहे.  तो तिच्या शरिराचे तुकडे तुकडे करण्याची धमकी देताे, अशी तक्रार तिने वसईच्या तुळींज पोलिस ठाण्यात  तक्रार दाखल केली होती. तिने म्हटले हाेते, आफताब  रोज मारहाण व शिवीगाळ करतो. आज त्याने माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला. तो मला सातत्याने धमकी देत असतो. आफताबने मला एकदा शरीराचे तुकडे -तुकडे करुन फेकून देईन, अशी धमकी दिली होती. गेल्या सहा महिन्यांपासून तो मला मारहाण करत आहे. तो माझ्यासोबत कसा वागतो आणि मला जीवे मारण्याची धमकी देतो, हे त्यांच्या कुटुंबीयांनादेखील  माहिती आहे. मला आता त्याच्यासोबत राहण्याची इच्छा नाहीये. तो मला सतत ब्लॅकमेल करत असतो. अशातच माझ्यासोबत काही बरे-वाइट झाल्यास त्यास आफताब जबाबदार आहे.

तक्रार करूनही कारवाई केली नाही असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे. त्यावेळी राज्यातील सरकार वसुलीच्या खेळात नसते आणि तृष्टीकरणाच्या राजकारणापासून दूर असते तर श्रध्दाचा जीव वाचला असता असे त्यांनी म्हटले आहे.