सातारा मधून अपघाताची बातमी समोर येत आहे. साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातातून जयकुमार गोरे सुखरूप बचावले आहेत. आता त्यांची प्रकृती एकदम चांगली आहे. या घटनेत त्यांच्या सोबत असलेले तीघं जण ही किरकोळ जखमी झाले आहेत.
साताऱ्यातील फलटण येथे जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बानगंगा नदीच्या पुलावरुन जात असताना अचानत गाडीच नियंत्रण बिघडल्याने जयकुमार गोरे यांची गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. यावेळी नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली.
जयकुमार गोरे यांच्यासोबत गाडीत तिघजण होते. त्यांचे कॉन्सटेबल, खासगी सचिव आणि एक कार्यकर्ते जयकुमार गोरे यांच्यासोबत गाडीत होते. या तिघांनाही किरकोळ मार लागला असून त्यांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. जयकुमार गोरे यांच्यासह गाडीत असलेल्या सर्वांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं असून पुण्यातील रुबी हॉल येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व कुटुंबीय यांनी रुग्णालयात भेट देऊन मोरे यांच्या प्रकृती बाबत विचारणा केली. अशी माहिती जयकुमार गोरे यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.
