महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासात 2019 ह्या वर्षाचे वेगळे स्थान आहे. अनेक नाट्यमय घटना ह्यावर्षी झाल्याच्या आपल्याला बघायला मिळाल्या. यावर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत कोणत्या एका पक्षाकडे नव्हतं. सर्व पक्षांच्या पारंपारिक युती-आघाडी बघून यावेळी भाजप शिवसेनेचे सरकार स्थापन होईल यात शंका वाटत नव्हती. शिवसेना मुख्यमंत्री पदावर बसलेली होती यातच संजय राऊत रोज सकाळी माध्यमांद्वारे आम्हाला मुख्यमंत्री पद मिळावं असे अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ठरलेय असे सांगायचे. हे सगळं शरद पवार बघत असताना मध्येच राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि शिवसेना युतीची चर्चा सुरू झाली. पुढे ही युती होऊन याला महाविकास आघाडी सरकार असे नाव दिले.
29 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याची चर्चा सुरू झाली उपमुख्यमंत्री जयंत पाटील व अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली व अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. यावेळी मात्र जयंत पाटील नाराज आहेत. अशा बातम्या समाज माध्यमांमध्ये बातमी येऊ लागल्या.
परंतु सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे तीन चाक तीन दिशेने असल्याचे दिसत होते. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय दिसून आला नाही. निधी वाटपावरून व इतर गोष्टींवरून तिन्ही पक्षांमधील छोटे-मोठे नेते कार्यकर्ते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येत होते.
विधान परिषद निवडणूक धक्का देत भाजपने चमत्कार केला यावेळी देखील महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेल नसल्याचे दिसून आलं. सुरुवातीला नागपूर,अकोला,वाशिम आणि बुलढाणा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. यावेळी भाजपने महाविकास आघाडीची 96 मते फोडली ते निकालानंतर स्पष्ट झालं. तिथे भाजपचे उमेदवार निवडून आले. राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये देखील हे चित्र पाहायला मिळालं व लोकांमध्ये देखील संख्या कमी असताना उमेदवार निवडून आणले.
भारत जोडो यात्रा यावेळी महाराष्ट्रात आली त्यावेळी राहुल गांधींनी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला त्यांच्या विरोधात वक्तव्य केली यावेळी खासदार संजय राऊत यांनी सावरकरांवरील त्या वक्तव्यांचा निषेध करत या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे स्पष्ट केले. राहुल गांधी यांच्या मताशी आम्ही सहमत नसल्याचे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी माध्यमां पुढे स्पष्ट केले.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील महाविकास आघाडी एकत्र नसल्याचे चित्र दिसून आले. या अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे फारसे आक्रमक झालेले पाहायला मिळत नाहीत. दुसरीकडे कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाकडून या प्रकरणी राजीनामा द्यावा यासाठी विधानसभेत विधानपरिषदेत आवाज उठवण्याची ठाकरे गटाची मागणी होती. परंतु अजित पवार या मताशी सहमत नसल्याचे दिसून आले. सर्व घटनांमधून हे वारंवार दिसून येते की महाविकास आघाडी मध्ये सारं काही आलबेल नाही व ही युती फक्त आणि फक्त सत्तेसाठीच झाली होती हे स्पष्ट दिसत आहे.
