नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी वेगवेगळ्या प्रकारचे कथित घोटाळे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातून काही सिद्ध झाले नाही. म्हणून विरोधक संतापलेले दिसत आहेत. ह्यातच खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियान प्रकरणी नवीन माहिती समोर आणलीये. मग सभागृहात एयू नावरून राजकारण तापले या नावाचा संबधं आदित्य ठाकरे यांच्याशी जोडला गेलाय का? हा प्रश्न उपस्थित झाला.
आदित्य ठाकरेंवर आरोप होताच उद्धव ठाकरे व संजय राऊत नागपुरात दाखल झाले. संजय राऊत यांनी आता आपण बाँम्ब फोडणार असल्याचे सांगतले. पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेआणि संजय राऊतांनी वारंवार बॉंम्ब फोडण्याच्या वल्गना केल्या. आदित्य ठाकरे एकटे पडतायेत व त्यांना मदत म्हणून संजय राऊत यांनी हे बॉम्ब प्रकरण काढले. मुळात संजय राऊत यांच्या अशा वल्गनांना उद्धव ठाकरे ही कंटाळे असतील पण मुलासाठी ते घराबाहेर पडले व सभागृहात उपस्थित राहिले.
यावेळी बॉम्ब काही फुटला नाही. नेहमी प्रमाणे संजय राऊत यांनी ईडी व भाजप नेत्यांवर आरोप करण्यास सुरुवात केली.यावेळी राहुल शेवाळे प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला पण हा बार पण फुसका निघाला. ह्या सगळ्या प्रकरणामुळे आता उद्धव ठाकरेही शांत झाले का? या प्रकरणात अजित पवार यांनी उडी मारत कोणताही बॉम्ब फोडणार असल्याचं स्पष्ट केले.
राऊत आणि ठाकरे हे नागपुरात दाखल झाले यावेळी यांचा मुद्दा ना सीमावाद होता ना शेतकऱ्यांचे प्रश्न. मुद्दा हाच आदित्य ठाकरे ऐकटे पडतायेत म्हणून ही तथाकथित फौज नागपुरात बॉम्ब फोडण्यासाठी दाखल झाली. मात्र, काड्याची पेटी मातोश्री वरच विसरून आल्याचे दिसून आले. संजय राऊत हे नेहमीच विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका करतात पण त्यातून हाती काय लागते हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना नक्कीच पडला असेल.
संजय राऊत यांचे पक्षात एकच काम आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर कोणी टीका केली कि त्यांच्यावर पातळी सोडून बोलणे. हे बोलताना संजय राऊत काही गोष्टीच भान विसरतात.
