विधिमंडळ अधिवेशन असो की इतर कोणतही अधिवेशन, अधिवेशन म्हणले की सत्ताधाऱ्यांना घेरण्याच आणि सळो की पळो करून सोडण्याची विरोधकांना संधी असते. या अधिवेशना मध्येच जनतेच्या काही समस्या, मागण्या आहेत त्या मंत्र्यांपर्यंत पोहचून पाठपुरावा करून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम विरोधक व सत्ताधारी करत असतात. मात्र, विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीतील नेते सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले.
आज अधिवेशानाचा शेवटचा दिवस असताना देखील विरोध पक्षातील नेत्यांचे आंदोलन सुरूच आहे. परंतु ह्या आंदोलनाचा बेछूट आरोपांचा सत्ताधारी बाकांवरील नेते अजिबात विचलित झाले नाही. ते आपल्या बाकावर निश्चित आहेत. विरोधी पक्षनेत्यामध्ये आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये पहिल्या दिवसापासून समन्वय दिसला नाही. वारंवार पायऱ्यांवर आंदोलन करणे व काही मंत्र्यांवर आरोप करणे अधिवेशन बंद पाडणे आम्ही शिंदे -फडणवीस सरकार विरोधात बॉम्ब फोडणार अशा वल्गना करण्यातच विरोधकांनी अधिवेशनात वेळ घटल्याचे दिसून आले. यासर्व गोष्टींमध्ये काहीच तथ्य नसल्याचे देखील सर्वांच्या समोर आले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्याकडे बॉम्ब आहे. पण तो आपण योग्य वेळी फोडू असे सांगितले. त्यांनी महाविकास आघाडीला तोंडावर पाडले. यातच संजय राऊत यांनी देखील अनेक वल्गना केल्या. शिंदे -फडणवीस सरकार मधील नेत्यांना जेलमध्ये जावे लागेल असे आरोप केले परंतु त्यांना सिद्ध काहीच करता आले नाही व त्यांनी आपले हसू करून घेतले.
विरोधीपक्ष नेता म्हणून अजित पवार हे अधिवेशनाच्या काळात पाहिजे तसे आक्रमक दिसून आले नाहीत. विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी देखील काम केले आहे. नेत्याचे काम काय असते व ते कशा प्रकारे करावे लागते हे त्यांनी आपल्या कार्यकाळात दाखवून दिले. देवेंद्र फडणवीस यांनी कधीच पुराव्या शिवाय कोणावर आरोप केले नाहीत. त्यांची आरोप करण्याची पद्धत विरोधकांना चांगलीच माहितीये त्याच उत्तम उदाहरण म्हणजे नवाब मलिक. या अधिवेशनाच्या काळात विधिमंडळ परिसर हा फक्त आंदोलनाची जागा असल्याचे विरोधकांकडून भासवण्यात आले.
