विचारधारेला तिलांजली दिलेल्या सुषमा अंधारे

राजकारणात पक्ष प्रवेश हा मुद्दा काही नवा नाही, परंतु काही मंडळी सामाजिक चळवळीतून आपल्या फायद्यासाठी राजकारणात येतात.आपल्या स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचं काम करतात याचंच एक उदाहरण म्हणजे सुषमा अंधारे. अंधारे यांनी सुरुवातीच्या भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका म्हणून काम केलं. यांनतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आपल्या फायद्यासाठी राजकारणाला सुरुवात केली.
राष्ट्रवादी हा पक्ष तसा अंधारे यांच्या विचारांचा पक्ष. त्या पक्षात असताना विरोधकांवर आरोप करणे टीका करणे हे काम करत व हिंदू देवी – देवतांवर टीका करण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं. विरोधकांना हिणवण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली. २८ जुलै २०२२ रोजी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ह्या त्याच सुषमा अंधारे ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंपासून आदित्य ठाकरे यांचावर मोठ्या प्रमाणात टीका केली. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांसोबत युती करून आपल्या विचारांना तिलांजली दिली अशा पक्षात सुषमा अंधारे ज्यांनी राजकारणात येण्यासाठी आपल्या स्वार्थासाठी स्वतःच्या विचारांना तिलांजली दिली असे विचारहीन लोक एकत्र आले.

   ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्या स्वघोषित फायर ब्रँड नेत्या झाल्या ह्या नेत्या आता शिंदे गटातील नेत्यांचे जुने व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर टीका करण्याचं काम करत आहेत परंतु त्यांना कधी स्वतःच्या जुन्या व्हिडिओ बद्दल ब्र देखील काढला नाही. आपल्या स्वार्थासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करणाऱ्या तथाकथित फायर ब्रँड नेत्याकडून ही अपेक्षा करणे देखील चुकीचं आहे. 

तरीही अंधारे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या बद्दलची या पूर्वीच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण द्यावं. तसेच लोकांच्या श्रद्धा स्थानांबद्दल त्यांनी टिंगल-टवाळी केली त्यावरी स्पष्टीकरण द्यावं तसेच उद्धव ठाकरे यांनी त्यांचे हिंदुत्वाचे विचार अंधारे यांना सांगावेत. ज्याविचार धारेला अंधारे यांनी आयुष्यभर विरोध केला त्या विचारधारेशी आता कास का जुळवून घेता हेही आधी स्पष्ट करावे.