शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या मुळेच फुटली का?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला. ठाकरे गटातील नेते याला बंड केला असं म्हणतात परंतु शिंदे गटातील नेते आम्ही बंड नाही तर उठाव केला असं म्हणतात. परंतु शिवसेना फुटली आणि ती मोठया प्रमाणात फुटली. तसं राजकारणात एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणे काही नवीन नाही. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार, खासदार फुटल्याची ही पहिलीच वेळ असावी. या आधीही शिवसेनेतून अनेक नेते बाहेर पडले आहेत.


पण या शिवसेना फुटीला जबाबदार कोण? सध्या उद्धव ठाकरे यांच्या कडे १०-१५ आमदार व २-४ खासदार असतील. विजय शिवतारे म्हणतात याची सुरुवात मी केली तर तानाजी सावंत म्हणतात मी सुरुवात केली का मग एकनाथ शिंदे कि अजून कुणी? यामध्ये भाजपचा मोठा हात असल्याच बोलले जाते. भाजप म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचं प्रखर्षाने वापरलं जात. परंतु शिवसेना फुटण्याला सर्वस्वी जबाबदार कुणी असलं तर ते म्हणजे एकमेव उद्धव ठाकरे. याची सुरुवात त्यांनी २०१९ मध्ये केली. भाजप सोबत फारकत घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली व आपल्या मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी त्यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले. स्वतः मुख्यमंत्री व मुलाला मंत्री करून महत्वाची मंत्री पदे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस साठी सोडले.


यांनतर उद्धव ठाकरे यांनी पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांना हळू – हळू बाहेर काढण्याचे काम सुरु केलं. कालांतराने उद्धव ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना भेटणं देखील कमी केलं. पक्ष वाढीसाठी जेंव्हा महाराष्ट्रात फिरणं गरजेचं होत तेंव्हा देखील फक्त मुंबई ला चिटकून बसण्याचं काम ठाकरे यांनी केलं. कदाचित मुंबई म्हणजेच महाराष्ट्र असल्याचा भास त्यांना झाला असावं. पक्षात त्यांच्या उंचीचा होण्याचा प्रयत्न केला तर त्याला खड्यासारखं बाजूला टाकण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनोहर जोशी यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला स्टेज वरून अपमानास्पद रित्या स्टेज वरून खाली उत्तरावण्याचं काम उद्धव ठाकरे यांचंच.


माझं कुटुंब माझी जबाबदारी या प्रमाणे स्वतः उद्धवजी मुख्यमंत्री झाले मुलाला मंत्री केलं. आणि रश्मी ठाकरे ही पक्षातील काही महत्वाचे निर्णय घेऊ लागल्या. मेहुण्याला कंत्राटं देण्याचं काम सुरु केलं. भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी हे मुख्यमंत्री झाले व तिथून पक्षाचा ऱ्हास होणं सुरु झालं. यांच्या मुख्यमंत्री पदामुळं त्यांच्या पक्षातील नेत्यांना अपेक्षित असे मंत्रीपद भेटले नाहीत. तानाजी सावंत सारख्या नेत्यांना पक्षातून बाहेर ठेवणे शिव तारे सारख्या नेत्यांमागे पूर्ण ताकदीनीशी उभं न राहणे ह्याच गोष्टीमुळे पक्षातील मंडळी नाराज होत आहेत हे त्यांना कदाचित त्यावेळी समजलं नसावं ह्याच कारणामुळे पक्ष फुटला व या सर्व गोष्टींसाठी फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचं दिसत. यात त्यांना थोडी मदत ही संजय राऊत यांनी देखील केली. पक्ष फोडण्यात त्यांचा देखील खारीचा वाटा आहे हे नाकारता येणार नाही.