अनिल देशमुख यांची जामिनावर सुटका निर्दोष मुक्तता नाही

राष्ट्रवादीचे काही नेते भ्रष्टाचाराच्या आरोपात जेल मध्ये गेले परंतु त्यांनी जेलच्या बाहेर आल्यावर आपण काहीच केलं नाही आपल्याला सरकारने सूडबुद्धीने आत टाकलं असं जनतेला भासवतात. राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यातील एक आहेत. मुळात अनिल देशमुख हे जामिनावर जेलच्या बाहेर आले आहेत त्यांना कोर्टाने निर्दोष सोडले नाही.

       अनिल देशमुख यांची सुटका झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पण त्यांची जामीन झाली आहे. कोर्टातून मुक्त अजूनही ते झाले नाहीत हे त्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सांगणं देखील गरजेचं आहे. अनिल देशमुख यांचा जामीन कोणत्या मुद्यांवर आहे. कोर्टानी त्यांना काय सूचना दिल्या आहेत? देशमुख यांच्या पहिल्या जामीनावर कोर्टाने १० दिवसांची स्थगिती दिली. त्यात काय नमूद केलं होत ते पाहणे गरजेचं आहे. अनिल देशमुख यांना निर्दोष सोडले नाही. ३ एप्रिल २०२२ रोजी अनिल देशमुख यांनी जामिनीचा अर्ज केला होता. माझं वय ७३ वर्ष आहे. अनेक व्याधी मला आहेत अनेक आजार आहेत या आजारांवर उपचार करण्यासाठी मला जामीन देण्यात यावा तसेच अनिल देशमुखांना जेल मध्ये १ वर्षांचा कालावधी झाला होता. या सगळ्या बाबींचा विचार करून कोर्टाने त्यांना जामिन मंजूर केला. 

  अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना सचिन वाझे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची नियुक्ती केली होती. सचिन वाझे आजही तुरुंगात आहेत. या दोघांनाही अनिल देशमुख यांनीच नियुक्त केलं होत. त्यामुळे अनिल देशमुखांविरोधात ते खोटा जवाब देणार नाहीत. कोर्टाने अनिल देशमुख यांची जी करोडो रुपयांची संपत्ती जप्त केली आहे ती वापस केली नाही जर ते निर्दोष असते तर कोर्टाने त्यांची संपत्ती त्यांना वापस केली असती. त्यांना जामीन जरी दिला असला तरी त्यांना काही अटींवर हा जामीन दिला आहे हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. 

सीबिआय चौकशीसाठी त्यांनी सहकार्य करावं. चौकीशीसाठी बोलावलं जाईल त्यावेळी उपस्थित राहावं, कोर्टाच्या परवानगी शिवाय मुंबई शहर सोडू नये तसेच आपला पासपोर्ट जप्त करावा या सर्व अटींवर अनिल देशमुख यांना जामिन मिळाला आहे. जमिनीवरची सुटका काही निर्दोष म्हणून मुक्तता नसते.
हे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे तसेच आम्ही काहीही केलं नाही.