अजित पवार यांना वाण नाही पण गुण लागला

महापुरुषांच्या नावांचा आपल्या सोयीनुसार वापर आजपर्यंत राष्ट्रवादी पक्ष व शरद पवार करत आले आहेत. पवार यांनी नेहमी आपल्या राजकीय फायद्यासाठी महापुरुषांच्या नावांचा वापर केला. पवारांचा पक्षातील इतर नेते देखील हेच काम करतात, मुस्लिम मतांवर डोळा ठेऊन जातीचे राजकारण करतात. परंतु अजित पवार त्यांच्या या विचारातून वेगळे राहिले, अजित पवार हे स्पष्ट वक्ते व अभ्यासू नेते अशी यांची ओळख आहे परंतु त्यांना वाण नाही पण गुण लागला असं म्हणायला काही हरकत नाही.
अजित पवार हे देखील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बरळलेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या नामकरणावर आपली भूमिका मांडत असताना छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. स्वराज्यरक्षक होते त्यांना धर्मवीर म्हणने चुकीचे आहे असं अजित पवार म्हणाले मुळात छत्रपती संभाजी महाराजांच धर्मवीर हे नाव इतिहासाच्या सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. हे अजित पवार यांनी लक्षात घायला हवे. संभाजी राजेंच्या बलिदानाला धर्मवीर या नावाने गौरविले आहे. अजित पवार यांनी कोणत्या दाखल्या नुसार हे वक्तव्य केलं हे त्यांनी आधी स्पष्ट करावे.
मुळात राष्ट्रवादीने नेहमीच आपले राजकारण हिरवे करणाच्या मुद्यावर केले आहे. इतिहासाचे देखील हिरवे करणं करण्याचा प्रयत्न नेहमीच राष्ट्रवादीतील नेत्यांनी केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्माचे रक्षण केले. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मांतर करण्याचे सांगितले परंतु संभाजी राजेंनी ते मान्य केले नाही यावेळी संभाजी राजेंना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या तरी स्वधर्माची भाषा सोडली नाही. याची अजित पवार यांना देणं गरजेचे आहे.
मुळात अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी असे वक्तव्य करून लोकांना कोड्यात पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. अजित पवार यांच्या वक्तव्यावर मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. मुळात त्यांच्या कडून ती अपेक्षा व्यक्त करणं देखील चुकीचंच आहे