राजस्थानच्या पाली येथे मोठा रेल्वे अपघात, ११ बोगी रुळावरुन घसरल्या…!

राजस्थानच्या पाली येथे ‘सूर्यनगरी एक्सप्रेस’ या रेल्वेला मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या रेल्वेच्या ११ बोगी रुळावरुन घसरल्या आहेत. रुळांमध्ये असलेल्या बिघाडामुळे हा अपघात झाला. आणि एकूण ११ बोगींना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये २४ नागरिक जख्मी झाल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे ३ वाजून २७ मिनिटांनी हा अपघात झाला. यामुळए एकूण १२ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. आणि अनेक गाड्या यामुळे उशीराने धावत आहेत. एकूणच नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहे.



पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार अजून तरी कुणाचीही जीवित हानि झाल्याचे समोर आले नाही. मात्र या अपघातात २४ नागरिक जख्मी झाल्याचे समोर आले आहे. सुमारे ८ स्लीपर क्लास बोगी आणि ३ इतर बोगी रुळावरुन घसल्याची माहिती समोर आली आहे.



रेल्वेला झालेल्या या मोठ्या अपघातामुळे रेल्वेचे वेळापत्रक देखील बदलले आहे, त्यामुळे नागरिकांना सुचवण्यात आले आहे कि त्यांनी प्रवास करण्याआधी वेळापत्रक नीट तपासावे, आणि बदललेल्या वेळेनुसार प्रवास करावा. तसेच घटनास्थळी अधिकारी आणि सध्या मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. एकूणच या संदर्भात पुढे काय होतं. आणखी काय माहिती हातात येते, हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.