महाविकास आघाडीची हातातील सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा रश्मी ठाकरे यांच्या कडे वळवला आहे. किरीट सोमय्या यांनी असा आरोप केला आहे की उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रतिज्ञा पत्रात रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले दाखवले नाहीत. रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातील ग्रामपंचायतने पंचनामा करून ह्या बंगल्यांची घरपट्टी पहिले ६ वर्ष अन्वय नाईक यांनी भरली तर पुढली ८ वर्ष रश्मी ठाकरे यांनी भरली असून आपलं मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हे बंगले गायब केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्ह्यापरिषदचे साईओ किरण पाटील यांनी ग्रामसेवकावर दबाव आणून रेकॉर्ड मिटवले. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस स्टेशन मध्ये याची तक्रार दिली आहे. या आरोपांमुळे ठाकरे परिवाराची कोंडी होणार का? ज्याप्रकारे महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे गटातील नेत्यांवर गद्दार, बोके, रेडे, खोके अशा प्रकारे खालच्या पातळीवर टीका केली. यावर शिंदे गटातील नेत्यांनी प्रतिउत्तर देणे टाळले यावर जास्त भाष्य शिंदे गटातील नेत्यांनी केले नाही.
यावर नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला होता, ते म्हणाले होते सहन करण्याची एक मर्यादा असते तुम्ही कुणावर आरोप करता ज्यांना तुमची सगळी अंडीपिल्ली माहित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा ठाकरे गटाला इशारा होता. किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे त्यांच्या १९ बंगल्याचा विषय सोडून दिला होता. परंतु नेहमी प्रमाणे संजय राऊत हे बरळले व पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले कि रश्मी ठाकरे यांच्या नावावर १९ बंगले असतील तर मी राजकारण सोडेल अशी घोषणा त्यांनी केली. मुळात संजय राऊत यांच्यावर देखील घोटाळ्याचे आरोप आहेत त्यासाठी ते जेल मध्ये देखील जाऊन आले आहेत.
महाविकास आघाडीच्या काळात हे प्रकरण दाबण्यात आले असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामुळे ठाकरे कुटुंबीयाची कोंडी होताना दिसत आहे. किरीट सोमय्या हे पुराव्याशिवाय आरोप करत नाहीत ते आधी पुरावे गोळा करतात व मग आरोप करतात. नाहीतर काही नेते रोज सकाळी उठून कुणावरही चिकलफेक करण्याचे काम करतात असं किरीट सोमय्या करत नाहीत. सोमय्या यांनी ज्यांच्या ज्यांच्या वर आरोप केले आहेत त्यातील काही जण जेल मध्ये गेले काही लोकांवर ईडी ची कारवाई झाली आहे तर काही प्रकरण न्यायालयात देखील आहेत. त्यामुळं ह्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का हे पाहणं महत्वाचं ठरले.
