चालून आलेली सत्ता महविकास विकास आघाडीच्या हातातून गेल्याने मविआचे काही नेते सैरभैर झाल्याच पाहायला मिळतंय. त्यातलेच एक नेते म्हणजे संजय राऊत. संजय राऊत हे हल्ली रोज रात्री सत्ता आपल्या हातात आल्याचे स्वप्न बघत आहेत व याचं स्वप्नांमधून ते उद्धव ठाकरे यांना परत मुख्यमंत्री झाल्याचं पाहत आहेत.
मुळात संजय राऊत ह्यांनी त्यांच्या पक्षासाठी काय-काय योगदान दिले आहे हे त्यांनी एखाद्या जाहीर सभेत किंवा पत्रकार परिषदेतून सांगावे. त्यांनी नक्कीच २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षासोबत युती करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात व शिवसेना पक्ष संपवण्यात त्यांचं महत्वाचं योगदान आहे. हे कुणीच नाकारू शकत नाही उद्धव ठाकरे सुद्धा. सत्ता गेल्यांनतर हे संजय राऊत थोडे सैरभैर झाल्याचं पाहिला मिळतंय आदित्य ठाकरे यांच्या मदतीसाठी हे नागपुरात आले. बॉम्ब फोडण्याचं स्वप्न मनात घेऊन आलेले संजय राऊत नागपुरात येऊन स्वप्नांत रंगले.
हिवाळी अधिवेशनात आम्ही बॉम्ब फोडू मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढू त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडू अशा अनेक वल्गना राऊत यांनी केल्या परंतु असं काहीच झालं नाही. संजय राऊत ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, नागपूरच्या पुढील अधिवेशनात आपलाच मुख्यमंत्री ह्या मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी असेल, मंत्र्यांच्या बंगल्यात देखील आपलेच मंत्री असतील. आताचे मंत्री त्यावेळी माझी मंत्री होतील व आमदार नितीन देशमुख यांच्या घराबाहेर लाईनीत उभे असतील ह्या त्यांच्या वक्त्रव्यानंतर समोर बसलेले कार्यकर्ते त्यांच्यावर हसत असतीलच पण त्यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे देखील संभ्रमात पडले असतील.
संजय राऊत हल्ली फक्त स्वप्नच बघतात हे मात्र त्यांच्या ह्या वक्तव्यावरून लक्षात येते. आमचा मुख्यमंत्री आमचे मंत्री ह्या सर्व गोष्टीसाठी आधी संजय राऊत यांना स्वप्नातून बाहेत यावे लागेल व आपल्या पक्षाची काय अवस्था आहे ती कुणामुळे आहे हे पाहावं लागेल.
