आव्हाडांचे वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादीची विचारधारा?

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हेत अशी टिप्पणी केली या पाठोपाठ जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाचे कौतुक केले असे वक्तव्य करणे किंवा हा विचार राष्ट्रवादीच्या रक्तातच आहे.

  जितेंद्र आव्हाड हे वक्तव्य करून वेगळे झाले. त्यानंतर माध्यमातून ही बातमी प्रसारित झाली व हे जितेंद्र आव्हाड यांच्या लक्षात आल्यानंतर आपली चूक लक्षात घेऊन त्यांनी या वक्तव्याची सावरा-सावर करण्याचा प्रयत्न केला.औरंगजेब किती क्रूर होता त्याने आपल्या भावांची कशी हत्या केली होती हे बोलण्यास त्यांनी सुरुवात केली.

  आव्हाडांच्या मते, "छत्रपती संभाजी महाराजांना अटक केल्यानंतर महाराजांना जेव्हा बहादूर गडावर नेण्यात आले तिथे एक विष्णूचे मंदिर होते आणि औरंगजेब जर क्रूर असता किंवा हिंदुद्वेष्टा असतात तर त्याने विष्णूचे मंदिर फोडले असते असा अजब दावा आव्हाड यांनी केला मुळात औरंगजेब हा किती धर्म वेडा होता याचे दाखले आपल्याला इतिहासात पावलो-पावली मिळतील.

  मुळात आव्हाडांचे राजकीय दैवत शरद पवार याचं शरद पवारांनी  2019 मध्ये एका जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं की, आम्ही मुस्लिमांमुळे सत्तेत आलो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नेत्यांची मानसिकता अशीच आहे आव्हाड देखील मुस्लिम बहुल भागातून निवडून येतात. त्यामुळे त्यांना मुस्लिमांवर विशेष प्रेम आहे हिंदू आणि हिंदुत्व म्हटलं की त्यांच्या पोटात गोळा येतो महाराष्ट्राच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न वारंवार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे व सातत्याने केला जातो. आव्हाडांचे विधान देखील याच विचारांचे उदाहरण आहे.