महाराष्ट्राच्या व एकंदरीतच राजकारणात शब्दाला फार महत्त्व असते. अशाच बंदखोलीतील शब्दावर उद्धव ठाकरे व संजय राऊत हे गेल्या २-३ वर्षांपासून राजकारण करत आहेत. तसाच एक शब्द उद्धव ठाकरे यांनी देखील दिला होता तो म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यासोबत आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु असं झालं नाही उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला नाही उद्धव ठाकरे यांना पुन्हा ते मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा आहे का? की मग दुसरं काही कारण आहे.
शिवसेनेतील दोन्ही गटांच भवितव्य हे कायद्याच्या पेच प्रसंगात अडकलं आहे तसेच विधानपरिषदेतील पक्षीय बहुमत हा मुदा महाविकास आघाडीसाठी महत्वाचा आहे. जुलै २०२२ मध्ये तत्कालीन विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक यांचा कार्यकाळ संपला त्यामुळे उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे ह्या पीठासीन अधिकारी म्हणून कार्यकाळ सांभाळत आहेत. अशातच विधानपरिषद सभापती पदाची नेमणूक लवकरच करण्यात येईल यावेळी पक्षीय बहुमत महत्वाचं ठरेल. विधानपरिषदेची सदस्य संख्या ही ७८ आहे यात भाजप चे २२ सदस्य असून महाविकास आघाडीचे २८ अशी सदस्य संख्या आहे.
बहुमताचा आकडा २९ असा असून जर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त १२ आमदार नियुक्त केले तर मात्र भाजपची बाजू मजबूत होऊ शकते. हे एक कारण उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा न देण्याचं असलं. यामागं अजून एक महत्वाचं कारण हे ही असू शकत की ठाकरे गटाकडे पाहिजे तसा आक्रमक चेहरा नाहीये, हे एक महत्वाचे कारण असू शकते. तसेच विधानसभेचा राजीनामा दिला तर उद्धव ठाकरे यांना सभागृहाला सामोरे जाता येणार नाही. ठाकरे गटाकडे तोडीचा नेता देखील हवा यामुळे देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला नसावा.
