राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान पुन्हा एकदा चीनचा विषय काढला. यापूर्वी देखील त्यांनी अरुणाचलमध्ये आपल्या सैनिकांना चिनी सैनिक मारत आहेत असं वक्तव्य केलं होतं. यापूर्वी जेव्हा गलवान खोऱ्यात जी लढाई झाली. त्याबाबत देखील काँग्रेस व राहुल गांधी यांनी अतिशय नकारात्मक अशी विधान केली. मुळात काँग्रेस सरकारला चीन विरोधात कधीच ठोस भूमिका घेता आली नाही तसेच राहुल गांधी यांना देखील नरेंद्र मोदी व भाजप यांच्या विरोधात बोलण्यासाठी काही नसल्याने अशा प्रकारचे विधान करतातं.
गलवान खोऱ्यातील लढाईवर देखील काँग्रेसने संशयास्पद विधान केली. त्यांनतर सैन्याच्या अधिकृत माहिती देण्यात आली जे काही घडलं होत त्याची सर्व माहिती देण्यात आली. यानंतर सर्व जगाने मान्य केलं कि भारतीय सैन्याने कशा प्रकारे धैर्याने लढा दिला आहे. चीनी सैनिकांकडून मात्र सगळी माहिती जाहीर करण्यात आली नव्हती त्या लढाईत किती सैनिक शाहिद झाले. त्यांचा अंत्यविधी कसा केला याची सगळी माहिती चीनी सैनिकांकडून लपवण्यात आली सैनिकांच्या घरी देखील ही माहिती देण्यात आली नव्हती.
मात्र यावर देखील काँग्रेस असभ्य पातळीवर बोलत आले आहेत. नरेंद्र मोदी हे चीनला घाबरतात असं त्यांच्या प्रवक्त्यांकडून वारंवार बोलण्यात आलं आहे. यांनतर चीनने कशाप्रकारे भारताचा भू-भाग बळकावला आहे हे वारंवार समोर आणले जाते परंतु हा भू-भाग कुणामुळे चीन ला भेटला याची माहिती देखील राहुल गांधी यांनी देणं गरजेचं आहे. १९६२ मध्ये हिंदी-चीनी भाई-भाई असं आपण म्हणत होतो. हे सगळं असूनही चीनने आपली भूमी बळकावली ही घटना १९६२ ची आहे. त्यावेळी लडाख मधील भू-भाग चीनने बळकावला आहे. तेव्हा नेहरू हे पंतप्रधान होते त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या नंतर राजीव गांधी नंतर पी.व्ही नरसिंहराव, डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान राहिले मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ यात मोठा राहिला. यासर्व काळात काँग्रेस नेत्यांकडून एक चकार शब्द देखील चीन बद्दल का काढला नाही हे आधी राहुल गांधी यांनी सांगावं.
आता राहुल गांधी सांगत आहेत की चीनने आपल्या भू-भागावर अतिक्रमण केलं आहे. या सगळ्या बाबतीत काँग्रेस व गांधी-नेहरू घराण्याची काय भूमिका राहिली आहे याचे अधिकृत पुरावे उपलब्ध आहेत. हे सगळं असतानाही राहुल गांधी व त्यांचे नेते सांगत आहेत कि चीनने आपली भूमी बळकावली पण कधी बळकावली हे पण काँग्रेसनं सांगणं गरजेचं आहे.
