गोंधळलेले अजित पवार

अजित पवार पत्रकार परिषद घेणार म्हटल्यावर सगळ्यांचेच डोळे त्या पत्रकार परिषदेकडे लागले होते. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात हिवाळी अधिवेशनात केलेल्या वक्त्यव्यावरून राजकारण चांगलच तापलेलं दिसत आहे. त्यांच्या विरोधात सगळीकडे आंदोलन होत आहेत अशातच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होत आहे. 

   ज्या प्रकारे राज्यपालांच्या विरोधात आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन झाले त्याच प्रकारे अजित पवार यांच्या विरोधात देखील भाजप व शिंदे गटाकडून आंदोलन झाले. यावर अजित पवार काय बोलणार त्याकडे सगळ्यांचेच लक्ष होते. अजित पवार आपल्या परखड व रोखठोक बोलण्यामुळे ओळखले जातात हे आपल्याला माहितीये. परंतु कालच्या पत्रकार परिषदेत तसं पहिला मिळाले नाही. अजित पवार हे काळ गोंधळलेले दिसले अपेक्षित उत्तर त्यांनी दिले नाहीत ते मूळ विषयाला बगल देताना काल दिसले. ऐरवी एखाद्या मुद्यावर बोलताना ते त्या मुद्याची सगळी माहिती घेऊन बोलतात त्या संदर्भातील कागदपत्र त्यांच्याकडे असतात. परंतु काळाचा मुद्दा हा भावनिक मुद्दा होता त्यावर त्यांनी सांभाळून व माहितीपूर्ण बोलणं गरजेच होत. 

    त्यांनी कालच्या पत्रकारपरिषदेत आणलेल्या कागदपत्रात राज्यपाल, चंद्रकांत पाटील व प्रसाद लाड यांनी काय वक्तव्य केले याची माहिती त्या कागदपत्रांमध्ये लिहून आणली होती. काल ते बोलले कि मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे व नंतर म्हणाले कि मी शरद पवार यांच्या वक्तव्याशी देखील सहमत आहे.यातून त्यांची दुटप्पीभूमिका दिसून आली. जर कुणाला छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणायचे असेल तर तो म्हणू शकतो त्यात काही वावगं नाही. ज्याला जी उपाधी छत्रपती संभाजी महाराज यांना द्यावीशी वाटत आहे. ती त्यांनी ती द्यावी असं शरद पवार म्हणाले परंतु शरद पवार देखील यावेळी गोल-गोल बोलताना दिसले, पुढे अजित पवार म्हणाले, मी माझ्या वक्तव्याशी सहमत आहे आणि दुसऱ्या बाजूला मी शरद पवार यांच्या वक्तव्याशी सहमत असल्याचं अजित पवार म्हणाले यावरून ते गोंधळलेले दिसले. 

  भाजपने आपल्याकडे राजीनामा मागण्याचे काही कारण नाही. भाजपने मला विरोधी पक्षनेता हे पद दिले नाही मला हे पद माझ्या पक्षाने दिले आहे असं अजित पवार या वेळी म्हणाले. मग अजित पवार व राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांचा व चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा कसा काय मागतात हे देखील अजित पवार यांनी स्पष्ट करावं कारण राज्यपालांना राज्यपाल हे पद केंद्र सरकारने दिले आहे. चंद्रकांत पाटील यांना देखील भाजपने मंत्रीपद दिले आहे हे देखील अजित पवार यांना ठाऊक असणं गरजेचं आहे. एकंदरीतच अजित पवार सध्या गोंधळलेल्या स्थितीत दिसत आहेत. हे सगळं चालू असताना अजित पवार २ दिवस कुठेही दिसले नाहीत. ते नेमके कुठे आहेत यावर देखील प्रश्न निर्माण झाला होता.