उर्फी जावेद प्रकरणात आता चर्चा न होता या विषयावर राजकारण सुरु झाल्याचे पाहायला मिळतंय. चित्रा वाघ यांनी उर्फ जावेद विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर यावर काही कारवाई होणं अपेक्षित होत. मात्र, तसं काही झाल नाही. या तक्रारीवरून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर व भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्च्याच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांच्यात यावरून राजकारण सुरु झाले. चित्रा वाघ यांनी आधीच स्पष्ट केलं कि आपल्याकडे याबाबत अन्य कुठल्यातरी महिलेने तक्रार केली होती.
उर्फी जावेदचे जे व्हिडिओ समाज माध्यमांवर असतात, त्यामुळे मुलांवर-मुलींवर परिणाम होऊ शकतो. अशी तक्रार त्या महिलेने दिली होती. त्यामुळे चित्रा वाघ यांनी त्या पद्धतीची तक्रार राज्य महिला आयोगाकडे केली होती. चित्रा वाघ ह्या भाजपच्या असल्यामुळे त्यांची ही वैयक्तिक तक्रार आहे किंवा भाजपची तक्रार आहे असं समजून राज्य महिला आयोगाने त्याकडे पाहिलं का? या तक्रारीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितल्याच दिसतंय. रुपाली चाकणकर यांच्याकडे जेव्हा याबाबत विचारले तेव्हा त्यांनी महिलांना कोणत्याही प्रकारचे कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे. कोणतेही कपडे निवडण्याचा अधिकार आहे, अशा पद्धतीचे विधान चाकणकर यांनी केले होते.
रुपाली चाकणकर यांचं म्हणणं देखील योग्य आहे. महिलांनी कसे कपडे परिधान करावे हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. परंतु सार्वजनिक ठिकाणी उर्फी जावेद अंग प्रदर्शन करते. त्याला देखील तुमचं संथान आहे का? कारण आतापर्यंत या प्रकरणात ज्या-ज्या वेळेस यासंदर्भात रुपाली चाकणकर यांनी आपले मत मांडले त्यावेळी त्यांनी उर्फी जावेदच्या अंगप्रदर्शनावर बोलणं टाळलं. यावरून उर्फी जावेदच्या अशा व्हिडिओ बनविण्यावर रुपाली चाकणकर आणि महिला आयोगाचा काही आक्षेप नाही. असंच दिसत आहे. राज्य महिला आयोग यावर काही कारवाई करत नाही. यावर काही पाऊल उचलत नाही अशी टीका केल्यानंतर चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली जाते. मात्र, उर्फी जावेद वर एक शब्द काढत नाहीत. यावरून असं दिसतंय की महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या अंगप्रदर्शनाच्या प्रकरणात राजकारण करतायत का?
