पुणे : राजकारणाबराेबर खेळातही स्वत:ची घराणेशाही टिकवून ठेवण्यासाठी आता पवार कुटुंबियाने कंबर कसली आहे. शरद पवार यांचे नातूही आता महाराष्ट्र क्रिकेट असाेसिएशनमध्ये सक्रीय झाले असून त्यांना अध्यक्षपदाची स्वप्ने पडू लागली आहेत.राज्यातील बहुतांश क्रीडा संघटनांवर पवार कुटुंबियांचा ताबा आहे.
शरद पवार यांनी खो-खो, कबड्डी व कुस्ती या देशी तिन्ही खेळांच्या राज्य संघटनांसह महाराष्ट्र ऑलिम्पिकचेही अध्यक्षपद मिळविले हाेते. त्यांचे पुतणे अजित पवार यांनीही महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळले हाेते. राज्यात राजकारणात विविध पदांवर असतानाही महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदावर त्यांचीच मक्तेदारी आहे. सर्वाधिक आर्थिक उलाढाल असणाऱ्या क्रिकेटमध्ये शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआयचे आणि आयसीसीचे अध्यक्षपद मिळविले हाेते. क्रिकेटमध्ये अजित पवार यांना कधी चंचूप्रवेश मिळाला नव्हता. मात्र, शरद पवार यांचे नातू राेहित पवार क्लब गटातून विजयी झाल्याने महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन सदस्य बनले आहेत. त्यांना अध्यक्षपदाचीही स्वप्ने पडू लागली आहेत.
गेल्या दाेन दशकांपासून पवार कुटुंबियांनी राज्यात क्रिकेटपासून इतर देशी खेळांवर वर्चस्व राखले आहे. घराणेशाहीची हिच परंपरा पुढे नेण्यासाठी आता राेहित पवार यांना पुढे आणण्यात आले आहे.
