राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचं स्थान आहे. शरद पवार यांनी अनेक महत्वाची पदे भूषवली. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होते. त्यावेळी त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याकडे पक्षाची जबाबदारी होती. सुप्रिया सुळे देखील पक्षात सक्रिय होत्या पण त्या खासदार असल्याने राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत्या. अशातच, अजित पवार यांच्याकडे पक्षाची सूत्र येताना दिसत होती. मात्र अजित पवार यांच्या पक्षीय राजकारणामुळे शरद पवार यांनी त्यांच्या हातात कधीच एक हाती सूत्र दिले नाहीत. अशातच रोहित पवार हे सक्रिय राजकारणात आले आणि हळू-हळू पक्षात त्यांचे महत्व वाढताना दिसत आहे.
मावळ मधील अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये झालेला पराभव आणि रोहित पवार यांचा कर्जत-जामखेड मतदार संघातून झालेला विजय ही घटना देखील शरद पवार यांचा रोहित पवार यांच्यावरील विश्वास दाखवते शरद पवार यांच्या नंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार यावर चर्चा होते.तेव्हा अजित पवार यांचा नाव पुढे येत त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे यांचा देखील. नाही म्हणलं तरी राष्ट्रवादी मध्ये गट आहेत अजित पवार यांचा व शरद पवार यांचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांचं देखील एकमत नसल्याचं दिसत आहे. अशातच रोहित पवार यांचं आमदार होणं व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी त्यांची निवड होणं व आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड होणं ही त्यांच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. प्रश्न हा आहे की रोहित पवार सारख्या नवख्या आमदाराला शरद पवार येवढं महत्व का देत आहेत.
राष्ट्रवादीमध्ये घराणेशाहीच राजकारण चालत हे आत महाराष्ट्राला कळालं आहे अशातच अजित पवार यांचं सत्ताकेंद्री रहाणं हे भविष्यात पक्षाला हे धोक्याचं ठरू शकत. हे शरद पवार यांना माहित आहे सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची सूत्रे जर देण्याचा विचार झाला. ट्रैक मोठी आमदारांची ताकद त्यांच्या माघे उभी राहावी व पक्ष व्यवस्थिपणे चालावा यासाठी शरद पवार यांच्या कडे रोहित पवार हे पर्याय म्हणून आहेत म्हणूनच रोहित पवार यांचं पक्षातील सक्रिय राजकारणात व एकंदरीतच राज्यातील राजकारणात रोहित पवार यांचं महत्व शरद पवार वाढवत आहेत. त्यांच्या मागील काही निर्णयावरून दिसून येत आहे. राष्ट्रवादी पक्षात अजित पवारांना पर्याय म्हणून रोहित पवार यांचा महत्व वाढवत आहेत का? हा प्रश्न निर्माण होत आहे.
