मुंबई : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जिजाऊ जयंती निमित्त मराठीमध्ये ट्विट करून अभिवादन केले. मात्र, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी साधे ट्विटही केले नाही. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना नेटकऱ्यांकडून प्रश्न विचारले जात आहेत. राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ट्विट करून त्यांना अभिवादन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर मराठीमध्ये ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,
राजमाता जिजाऊ म्हणजे धैर्याचे दुसरे नाव. नारी शक्तीचे दर्शन जिजाऊंमधून होते. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या मार्गदर्शक म्हणून त्यांचे नाव आपल्या इतिहासात नेहमीच जोडले जाईल. त्यांनी कायमच लोकांच्या कल्याणासाठी काम केले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन.
आज दिवसभर भरगच्च कार्यक्रम असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्याचा फाेटाे ट्विट केला आहे, मात्र उद्धव ठाकरे यांना ट्विट करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. उद्धव ठाकरे स्वतःला कोण समजतात? राजमाता जिजाऊ साहेब जयंतीचा साधं ट्विट नाही, वंदन नाही, अशी टीका नेटकऱ्यांकडून केली जात आहे.
