वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होण्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून ऐकायला मिळते. वेगवेगळ्या ठिकाणी ते एकत्र येतात एकमेकांना भेटताय त्यातून या दोन पक्षांची युती होईल असं कुठेतरी एक समीकरण जुळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि जवळपास या दोन नेत्यांमध्ये अडीच तास चर्चा झाली आणि त्यातून एक नवीन समीकरण उद्याच येतं की काय अशा चर्चा माध्यमांमध्ये होऊ लागल्या पण यावर स्पष्टीकरण देताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाबद्दल चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असं यावेळी आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
यापूर्वी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. पण या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीचे काय होणार अशा चर्चा सुरू झाल्या पण यावर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिलं आपण भारतीय जनता पार्टी सोबत जाणार नाहीत. सध्या एकनाथ शिंदे हे भाजप युतीत आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याची शक्यता तूर्तास तरी दिसत नाही असं असताना प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना ही एक सल्ला दिला आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सोबतच्या युतीतून बाहेर पडा कारण मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला चांगलं ओळखून आहे असे विधान त्यांनी केलं हे विधान खूप महत्त्वाचं मानलं जातं कारण या दोन्ही पक्षांसोबत त्यांचा जो काही अनुभव आहे तो त्यांनी यातून सांगितला व यांच्यासोबत न राहण्याचा सल्ला देखील उद्धव ठाकरेंना दिला.
हे प्रकाश आंबेडकर म्हणतात म्हणूनच नाही तर याआधी देखील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आपल्या गरजेसाठी छोट्या पक्षांना आपल्या सोबत घेतलं व नंतर त्यांना वाऱ्यावर सोडले असे उदाहरण देखील राजकीय इतिहासात आपल्याला पाहायला मिळतील म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्या बोलण्यात तथ्य आहे. उद्धव ठाकरे हे ऐकणार का? कारण या दोन्ही पक्षांचे उद्धव ठाकरे सत्तेत होते पण उद्धव ठाकरेंनी याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे की या दोन पक्षांसोबत जाऊन आपल्याला काय भेटलं या गोष्टीचा देखील त्यांनी विचार करणे गरजेचे आहे. पक्ष फुटी नंतर उद्धव ठाकरेंच्या गटात आता पंधरा आमदार शिल्लक आहे त्यामुळे उद्धव ठाकरे सध्या तरी महाविकास आघाडीतून बाहेर न पडता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला चिटकून राहतील असेच दिसत आहे. प्रकाश आंबेडकर ठाकरे यांच्यासोबत जातील का? ते आंबेडकरांचा सल्ला ऐकतील का? आणि या दोन पक्षांना सोडून प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करतील का हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.
