भारतात खादी उद्योगाच्या विक्री-निर्यातीत वाढ, यापासून राहुल गांधी अनभिज्ञ

सध्या कडाक्याच्या थंडीत ‘भारत जोडो यात्रेत’ पांढऱ्या टी-शर्ट मध्ये दिसणारे राहुल गांधी प्रसिद्धीच्या झोतात आहे. काही दिवसांपूर्वी कमल हसन यांनी त्यांची मुलाखत घेतलीये त्यावेळी खादीच्या मुद्दावर यांनी चर्चा केली विशेष म्हणजे कमल हसन यांनी खादीचे जॅकेट परिधान केलेले होते. नोटबंदीमुळे बेल्लारी जींस उद्योग बंद पडला. आता खादी उद्योगही मरणासन्न अवस्थेत असून त्याला पुनर्जीवन्न देण्याची गरज असल्याचे राहुल गांधी यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली. सरकारचे चुकीचे धोरण आणि जीएसटी त्याला कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. कोणतीही माहिती न घेता विधान करणे हे राहुल गांधीच्या बाबतीत नवीन नाही.

स्वातंत्र्याच्या आंदोलनात महात्मा गांधी यांनी चरखा चालून खादीला अभिमानाचा दर्जा मिळून दिला. आज देशात हजारो कुटुंब चरखा चालून आपला उदरनिर्वाह करत आहे. राहुल गांधींनी खादीच्या उद्योगावर शंका व्यक्त केली पण देशात इतके वर्ष काँग्रेसची सत्ता होते. काँग्रेसच्या कार्यकाळात या उद्योगाला उभारी देण्याचा प्रयत्न झाला का? तर त्यांचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. गांधी जयंती निमित्ताने २ ते ८ आक्टोबर दरम्यान खादीवर वर्षानुवर्षे देण्यात येणारी सुट ही काँग्रेसने दिलेली उभारी म्हणायची का?

राहुल गांधी आता खादी उद्योगावर खूप पोटतिडकीने बोलतायेत. या उद्योगावरील व्यक्तीचा कौशल्ये विकास घडवून आणला पाहिजे. त्यांच्या कौशल्याचा राष्ट्रासाठी उपयोग केला पाहिजे असे गांधी म्हणाले. अनेक योजना काँग्रेसच्या कार्यकाळात सुरु झाल्या पण त्यावर अंमलबजावणी कधी झाली नाही. काँग्रेसने मनरेगाची जाहिरात खूप केली. पण त्यांनी या योजनेची अंमलबजावणी कधीच योग्य पद्धतीने केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना चालू केल्या पण त्या योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित होत आहे की नाही याचा ते नियमितपणे आढावा घ्यायचे. एक उदाहरण द्यायचे झाले तर किसान सन्मान योजनेचे पैसे त्यांनी लोकांपर्यंत पोहचवले.

भारत जोडो यात्रा गांधी जयंतीच्या दिवशी कर्नाटकच्या बदनामोलू मध्ये गेली होती. बदनामोलूचे वैशिष्ट्ये म्हणजे १९३२ मध्ये खादी उत्पादन सुरू करणारी उत्पादन समिती इथ आहे. राहुल गांधींनी या भागातील स्थानिकांशी विचारणा केली असती, गेल्या काही वर्षात खादी उद्योगाला कायापालट कसा झालाय तर त्याची कल्पना त्यांना आली असती. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांचा पेहराव आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरायचा त्यावेळी मोदीजी आपली उंची वाढण्यासाठी असे पेहराव करतात, अशी टीका त्यांच्यावर व्हायची. वास्तविक तर मोदींना आपली परंपरा नव्हे तर खादीची परंपरा उंचवण्यासाठी हे सर्व केले होते. त्याचे अनेक उदाहरणे आहेत. मन की बात मध्ये कुटीर उद्योगाचा ते नेहमीच उल्लेख करतात. राहुल गांधींनी त्यातला ८१ वा भाग ऐकायला हवा होता. ज्यात पंतप्रधानांनी जनतेला खादीचा अवलंब करण्याविषयी सांगितले होते.

राहुल गांधी आणि कमल हसन यांनी मुलाखती दरम्यान खादीला मृत्य उद्योग असे म्हणले असले तरी सत्य अगदी उलटे आहे,खादी मंडळांच्या आकडीवारीनुसार २०२१-२२ मध्ये १.१५ लाख कोटींची उलाढाल झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात खादीची विक्री ४३ टक्क्याने वाढून ५५०२ कोटी विक्रमी उच्चांकावर पोहचली आहे. ही भारतातील कापड उद्योगातील सर्वात मोठी वाढ मानली जाते. सूक्ष्म आणि मध्यम उद्योगाच्या आकडेवारीनुसार १ लाख कोटी रुपयांची उलाढाल नोंदवणारा खादी उद्योग हा देशातली मोठी कंपनी बनला आहे. भारत सर्वाधिक खादीची निर्यात अमेरिका, जपान, रशियाला करतो. जगात सर्वाधिक मोठा खादी निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख आहे.

आज खादीचा वापर माणसाच्या पेहरावा पर्यंतच राहिलेला नाही. तर सरकारी रुग्णालयात देखील मलमपट्टीसाठी खादीच्या बँडेजचा उपयोग केला जातोय. राहुल गांधी असो की कमल हसन दोघेही खादीच्या बाबतीत अंधारात आहे, असेच म्हणावे लागेल. कधीकाळी वयोवृद्धांचा समजला जाणार हा पोशाख आज स्टेट्स सिंम्बॉल बनवला आहे, त्यांचं श्रेय नरेंद्र मोदी यांना दयावे लागेल.