गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये सोशल मीडिया वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं. उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. आता चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे.
दोघीही एकमेकींवर अनेक आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता अंगप्रदर्शन प्रकरणी उर्फीला मुंबई पोलिसांनी नोटीस दिली आहे. तसेच तिला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे. यामुळे आता उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. अंबोली पोलीस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. उर्फीला आज हजर होण्याची नोटिस देण्यात आली आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
चित्रा वाघ या देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन उर्फीच्या फॅशनवर टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी एक ट्वीट शेअर केलं होतं. या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी लिहिलं होतं, ‘मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बीभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली.
