राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या एक कोटींच्या आसपास आहे. या ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन घडवून आणण्याचा विचार सध्या राज्य सरकारचा सुरू आहे. प्रत्येक शनिवार-रविवारी ही सुविधा देण्यात येणार आहे.
यासाठी एसटी महामंडळानेही मदत कऱण्याची तयारी दर्शवली आहे. महामंडळाकडून दोन हजार एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातल्या प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारी ही सेवा असेल. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळांना जाण्यासाठी ही सेवा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिले आहेत.
महिन्याच्या प्रत्येक शनिवार-रविवारी जेष्ठ नागरिकांना ही संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी तब्बल दोन हजार एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी एसटी महामंडळाने दाखवली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळांना जाण्यासाठी ही सेवा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिले आहेत. ही सेवा देताना केवळ संबंधित व्यक्तींना आपल्या राहण्याचा आणि जेवणाचा खर्च करावा लागणार आहे. सध्या राज्यात 65 वर्षावरील नागरीकांना 50 टक्के तिकीट तर 75 वर्षांवरील नागरीकांना मोफत प्रवास जाहीर करण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून देवदर्शनासाठी जो प्रस्ताव करण्यात येतं आहे त्यामध्ये सर्वच जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे.
