तेजस ठाकरे राजकारणाच्या उंबरठ्यावर

एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले व शिवसेनेला एक मोठे भगदाड पडले. महाविकास आघाडी सरकार कोसळले, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपद देखील गेले, शिंदेंमुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडलं आता शिवसेनेतील गळती थांबत नाही, आमदारापाठोपाठ खासदारही पक्षातून बाहेर पडताना दिसतायत सोबतच पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी ही मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसतायेत. काही खासदार पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. आता काही काळाने शिवसेनेत दोन-चार डोके राहतात की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

    या भगदाडानंतर पक्षाचे चिन्ह व नाव दोन्ही गोठवले, शिवसेनेत दोन गट पडले, एक ठाकरे गट दुसरा शिंदे गट आता खरी शिवसेना कोणाची यावरून सुप्रीम कोर्टात वाद सुरू आहे अशातच उद्धव ठाकरे आपले दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे यांना राजकारणात उतरू शकतात तशी त्यांची धडपड पोस्टर बाजीतून दिसून येत आहे.  यावरून तेजस ठाकरे राजकारणाच्या उंबरठ्यावर उभे आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो भविष्यात तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय देखील होतील व युवासेनेची कमान सांभाळतील अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. युवासेनेत ही मोठ्या प्रमाणात फूट पडताना दिसत आहे तसेच अंतर्गत नाराजी देखील मोठ्या प्रमाणात आहे.

   अशी सगळी परिस्थिती असताना उद्धव ठाकरे यांच्या समोर पक्ष वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी सुसाट धावताना दिसत आहे ते शांत डोक्याने त्यांचं काम करत आहेत त्यामुळे शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. अशातच आता तेजस ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश होताना दिसतोय त्यामुळे काही दिवसांनी जर तेजस ठाकरे सक्रिय राजकारणात आले तर आश्चर्य वाटायला नको. परंतु तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चेमुळे आदित्य ठाकरे यांच्या बद्दल अविश्वास वाटत आहे का? हा प्रश्न देखील या निमित्ताने निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळेच कदाचित पोस्टर बाजीद्वारे व विविध सभांमधून व मोर्चा मधून तेजस ठाकरे हळूहळू पुढे येत आहेत व काही दिवसांनी ते राजकारणात देखील येतील. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच घराणेशाहीला विरोध केला आहे हा विरोध फक्त बोलण्यापुरताच होता. प्रत्यक्षात मात्र तसं काही होताना दिसत नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आता तेजस ठाकरे हे देखील राजकारणात येत आहेत.