मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवस साजरा करून फोटो काढून समाज माध्यमावर टाकल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या संपर्क प्रमुखाला पोलिसांनी अटक केली आहे. ठाकरे गटाचे नवी मुंबईचे संपर्कप्रमुख निलेश पराडकर यांना टिळक नगर पोलिसांनी केली अटक केली आहे.13 तारखेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (सदाशिव निकाळजे) याचा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त केक पराडकर यांनी समाज माध्यमावर फोटो व्हायरल केला. सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणात गुन्हा नोंदवला आहे.
