नुकतीच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे येथे पार पडली आणि ह्या कुस्ती स्पर्धेचं बक्षीस वितरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. हे बक्षीस वितरण पार पडल्यानंतर तीच चांदीची गदा विजेत्याला पुन्हा देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते ही गदा विजेत्याला देण्यात आली. नेमकं कशासाठी हा कार्यक्रम पुन्हा करायचा जर सत्कार करायचा असेल तर विजयाबद्दलचा सत्कार अनेकजण हार,तुरे देऊन करतात. पुन्हा तीच गदा देण्याचा आणि सत्कार करण्याचा घाट शरद पवार आणि त्यांचे कार्यकर्ते का घालत असतील नेमकं वारंवार सत्कार करायला शरद पवार नेमकं आहेत तरी कोण?
कोणत्याही क्रीडा स्पर्धेत एखाद्या संघाला यश मिळालं कि त्या क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला शरद पवार यांना उपस्थित राहवं लागत व बक्षीस वितरण करावं लागत. अशा कोणत्या क्रीडा प्रकारचे पवार तज्ज्ञ आहेत हे सामान्य नागरीकांना त्यांनी सांगाव कुस्तीगीर परिषद, क्रिकेट, कबड्डी अशा कुठल्याही खेळाच्या अध्यक्षपदी शरद पवार किंवा पवार कुटुंबातील व्यक्ती आहेच. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी देखील रोहित पवार यांची नियुक्ती झाली. आता रोहित पवार यांचं क्रिकेटसाठी किती योगदान आहे हे पण त्यांनी सांगावं कि आता महाराष्ट्रात शरद पवार किंवा त्यांच्या कुटुंबीया व्यतिरिक्त कोणाला कोणताच क्रीडा प्रकार कळत नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. आधीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ करून आता खेळातही राजकारण करण्याचा उद्योग शरद पवार यांना करायचा आहे, असंच वाटत आहे. त्यामुळेच पुन्हा-पुन्हा बक्षीस वितरणाचे कर्यक्रम करत असावेत.
नुसतं खेळाचं नाही तर राज्यातील कुठल्याही साहित्य संमेलनाचे उदघाटन किंवा समारोपाला शरद पवार ह्याची उपस्थिती असतेच. ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी देखील शरद पवार शिक्षण, साखर संघ, सहकार क्षेत्र, शिखर बँक आणि राजकारण सगळीकडे पवारच पवार म्हणजे फक्त शरद पवार नाही तर त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा त्यांच्या समर्थनातील मंडळी त्यामुळे प्रश्न पडतो कि शरद पवार आहेत तरी कोण?
