राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला होता. उपचारानंतर धनंजय मुंडे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस केली.
4 जानेवारीला परळीमध्ये मध्यरात्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातानंतर धनंजय मुंडेंना परळीमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण नंतर पुढच्या उपचारांसाठी मुंडेंना विमानाने मुंबईला आणण्यात आलं होतं. धनंजय मुंडे यांची सातवी आणि आठवी बरगडी फ्रॅक्चर झाली आहे, त्यामुळे त्यांना ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे उपचारानंतर मुंडेंना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
त्यांच्या या अपघातानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक नेत्यानी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली आहे. या कारणामुळे फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची भेट घेतली.
