शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची ही उपस्थिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीतील बैठकांमध्ये नेमकी काय खलबतं सुरू आहेत याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी लवकरच धडकणार की आणखी काही घडामोडी घडणार यावरून चर्चा सुरु आहेत. शिंदे -फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावरील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी दिल्लीत जोरदार खलबतं सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत याविषयी महत्त्वाची बैठक सुरु आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे हि ह्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत ही दिवसांपासून पंकजा मुंडे या नाराज असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे या बैठकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दौऱ्यावर आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारावरही या दौऱ्यात मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गटाचे आमदार दिल्लीकडे डोळे लावून बसले आहेत. तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड तसेच संजय शिरसाट यांनी पुढील काही तासात मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी धडकू शकते, असा दावाही केला आहे. त्यामुळे इच्छुकांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्या दिल्लीच्या दिशेने लागलं आहे.