राज्यात सत्ताप्राप्तीसाठी घराेबा केलेल्या शिवसेनेचा भगवा रंग पूर्ण पुसण्याचा चंग पवार काका- पुतण्यांनी बांधला आहे.त्यामुळे नामांतरकार म्हणून प्रसिध्दीस येत असलेले विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाप्रमुख अशी ओळख हाेती असे सांगताना त्यांच्या मुस्लिम लीगसाेबतच्या युतीची आठवण करून दिली.छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक म्हणावे असे अजित पवार यांनी म्हटले हाेते. आता बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूह्रदयसम्राट बराेबरच शिवसेनाप्रमुखच म्हणावे असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, हे करताना मुस्लिम लीगसाेबतच्या शिवसेनेच्या युतीची दुखरी आठवण त्यांनी करून दिली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधीमंडळात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांना आज हिंदुहृदयसम्राट असं ओळखलं जातं पण त्यांची खरी ओळख ही शिवसेनाप्रमुख अशी आहे. त्यामुळे त्यांच्या तैलचित्रावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असं लिहिण्यात यावं अशी मागणी विरोधी त्यांनी केली.शिवसेनेची ही दुखरी आठवण 1972-73 सालची आहे. त्यावेळी शिवसेनेनं रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (रा. सू गवई गट) सोबत मुंबई महापालिका निवडणूक लढवली. मात्र महापौर करण्यास शिवसेनेला काही जागा कमी पडत होत्या. यावेळी शिवसेनेनं मुस्लीम लीगचा पाठिंबा घेतला आणि शिवसेना नेते सुधीर जोशी हे मुंबईचे महापौर झाले.
त्यानंतर 1979 साली शिवसेना आणि मुस्लीम लीगचे नेते एकाच व्यासपीठावर आले हाेते. नव्वदच्या दशकात जेव्हा शिवसेनेनं हिंदुत्वाचं राजकारण करण्यास सुरुवात केली, तेव्हा विरोधकांकडून सेनेच्या मुस्लीम लीगसोबतच्या युतीच्या घटनेची आठवण करून दिली जाते.अजित पवार यांनी अगदी अभ्यासपूर्ण पध्दतीने मुस्लिम लीगसाेबतच्या युतीची आठवण करून दिली. याचे कारण म्हणजे काॅंग्रेस- राष्ट्रवादीच्या साेबत असलेल्या शिवसेनेचा भगवा रंग या दाेन्ही पक्षांना अडचणी ठरताे. त्यांचा मतदार त्यामुळे दूर जाण्याची भीती आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा भगवा रंग पुसून टाकण्याचा चंग शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्याने बांधला आहे. शिवसेनेला हिंदूत्वापासून दूर न्यायचे आणि राज्यातील आपल्यासारखाच प्रादेशिक पक्ष बनवायचे, असा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्यामुळे प्रखर हिंदूत्वाचा दावा करणाऱ्या शिवसेनेची अडचण झाली आहे.
