प्रसिद्ध अभिनेता सुमीत राघवन आपल्या अभिनयामुळे आणि वेगवेगळ्या चित्रपट आणि मालिकांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मात्र अनेकदा त्यांनी सार्वजनिक प्रश्नांवर त्यांनी केलेल्या भाष्यामुळे, त्यांच्या मतांमुळे देखील ते प्रसिद्ध झाले आहेत. मात्र आता त्यांच्या नावाची चर्चा होतेय, ती त्यांच्या एका ट्वीट मुळे. त्यांनी मुंबई मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यातून प्रवास केला, आणि त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता, आपला आनंद त्यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसेच मुंबई मेट्रो ही मुंबईकरांसाठी मिळालेलं अमूल्य भेटवस्तू आहे, असेही ते म्हणाले आहेत.

याआधी देखील कारशेड वरुन झालेल्या विरोधावेळी सुमीत राघवनने देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेत, विकासासाठी अनेकदा तडजोड करावी लागते आणि ती कधीकधी अपरिहार्य असते. असे मत देखील मांडले होते. त्यावेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मात्र आता त्यांचे मत किती खरे होते हे आपल्याला दिसून येत आहे.
त्यांच्या या ट्वीटला एका गाण्याच्या माध्यमातून उत्तर देत फडणवीस यांनी देखील राघवन यांना धन्यवाद म्हटले आहे. ते म्हणाले कि, “एका सामान्य माणसासाठी काम करण्यासारखं दुसरं सुख नाही. आमच्या या प्रयत्नांची प्रशंसा केल्याबद्दल धन्यवाद सुमीतजी. ही तर सुरुवात आहे. आपली मुंबई आणखी सुंदर आणि वेगवान होणार..मुंबईकरांनो तुम्ही फक्त अशीच साथ देत राहा.
त्यावर पुन्हा उत्तर देत सुमीत राघवन म्हणाले कि, “माझ्या ५२ वर्षात पहिल्यांदा मुंबईत सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायला मजा आली. मुंबईकरांच्या वतीने आभार.”
एकूणच मुंबई मेट्रो सुरु झाल्यापासून सामान्य माणूस ते सेलिब्रिटीज सगळेच आनंदात आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
