शरद पवार आजही भाजपाबरोबर, युतीच्या पहिल्याच दिवशी आंबेडकरांचा बाॅम्बगाेळा

मुंबई : शिवसेना आणि वंचित बहुजन विकास आघाडीची युती झाल्याच्या पहिल्याच दिवशी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर बॉम्बगोळा टाकला आहे. शरद पवार आजही भाजपसाेबत आहेत. 2019 च्या लाेकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांचे ठरले होते. अजित पवारांनी पहिली सुरूवातही केली हाेती असा आराेप आंबेडकरांनी केला आहे.

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी युतीची घाेषणा केली हाेती. शरद पवार यांनी असल्या भानगडीत मी पडत नाही म्हणून या युतीबाबत नाराजी व्यक्त केली हाेती. त्यामुळे महाविकास आघाडीचेच अस्तित्व धाेक्यात आले आहे. अशातच युती झाल्याच्या पहिल्याच दिवशी प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसवर हल्लाबाेल केला आहे.

‘एबीपी माझा’शी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरले हाेते.