फडणवीस यांना टार्गेट करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये गौप्यस्फोट केला त्यात ते म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या वेळेस माझ्यावर कोणता ना कोणता गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकण्याची तयारी सुरू होती आणि तत्कालीन जे पोलीस आयुक्त होते संजय पांडे यांना ती सुपारी दिली होती. सुपारी हा शब्द फडणवीस त्यांनी वापरला आहे अशा पद्धतीने आपल्याला तुरुंगात टाकण्यासाठी महाविकास आघाडी ही प्रयत्नशील होती. एक प्रकारे देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडीच्या केंद्रस्थानी आहेत. 2014 पासून म्हणजे देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले होते तेंव्ह पासून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे देवेंद्र फडणवीस यांना राजकारणापासून कसं लांब ठेवता येईल किंवा त्यांच्यावर कसा अंकुश ठेवता येईल या दृष्टीने प्रयत्न करत होते.

म्हणूनच सातत्याने त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारचे आरोप करणे त्यांना टार्गेट करणे हे विरोधकांकडून सातत्याने सुरू असतं हे सर्वजण पाहत आहेत आत्ता सुद्धा शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद का स्वीकारलं? यावरून देखील त्यांना टार्गेट केलं जातं. याआधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि आता अचानक उपमुख्यमंत्री पद कसं काय स्वीकारलं अशा पद्धतीचे प्रश्न त्यांना विचारले जातात आणि काही पत्रकार परिषदेतील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करून देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करतायेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय हे सगळं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी चालू आहे. त्यामुळे सध्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस आहेत कारण देवेंद्र फडणवीस हे आगामी काळातील प्रमुख नेते आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रीय राजकारणात देखील त्यांचं नाव आहे त्यामुळे महाराष्ट्र मध्ये त्यांची कशी कोंडी करता येईल यासाठी वारंवार प्रयत्न होत आहेत नवाब मलिक यांनी सुद्धा ते मंत्री असताना कोणत्यातरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्ती सोबत त्यांचे फोटो दाखवून फडणवीस यांच्या बदनामीचा प्रयत्न केला होता पण आज तेच नवाब मलिक तुरुंगात आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस यांना कसा अडकवण्यात येईल यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत होती.

देवेंद्र फडणवीस यांना सक्रिय राजकारणापासून जर बाजूला ठेवलं त्यांच्यावर अंकुश ठेवला किंवा त्यांना तुरुंगात टाकलं तर कुठेतरी आपल्याला राजकारणात तग धरता येईल हे त्यांना माहिती होतं म्हणूनच फडणवीसंना बाजूला ठेवण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू होते. महाविकास आघाडीचा प्रयोग देवेंद्र फडणवीस यांच्यापासून उद्धव ठाकरेंना वेगळे करण्याचा होता आणि त्यात शरद पवार यांना यश आले कारण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याची महत्वकांक्षा होती हे शरद पवारांनी जाणलं होतं. याचाच फायदा घेत देवेंद्र फडणवीस यांना बाजूला ठेवायचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने त्यावेळी केला.