आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत – दीपक केसकर

राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दावोस दौऱ्यात तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च झाल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला होता.तसेच मुख्यमंत्र्यांनी दावोस दौऱ्यात नेमके काय केलं? याचा तपशील जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली होती. आदित्य ठाकरेंच्या आरोपाला दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तसेच युवकांना मॅच्युरीटी असली पाहिजे. यापूर्वी अनेक मुख्यमंत्री चार्टड फ्लाइटने गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार्टड फ्लाईटने आले. पंतप्रधानांचा दौरा असताना ही टीका करणं चुकीचं आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार केल, त्या कंपन्या महाराष्ट्रातीलच आहेत असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावरही केसरकर यांनी उत्तर दिलं. त्यांनी जेव्हा दावोसला जाऊन करार केले तेव्हा त्यांच्यावेळी महिंद्रा कंपनी होती. ती काय आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपनी आहे का?, असा सवाल केसरकर यांनी केला.

कंपनी राज्यातील असली तरी त्यात परदेशी गुंतवणूक असते. परदेशी गुंतवणूकदारांना भारताशी करार करायचा असतो. तो दावोसला होतो. एवढा साधा कॉमनसेन्स रुणाला नसेल तर त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. त्यांच्यावर टीका करणार नाही. त्यांच्याबद्दल आदर आहे. पण माहिती घेण्यासाठी त्यांनी किमान प्रवक्ता नेमावा असा चिमटाही त्यांनी काढला.