मुंबई : एसटी आंदाेलनात मला अडकविण्यात आले हाेते. पाेलीस उपायुक्त निलाेत्पल यांनी पवारांच्या हल्या संदर्भात कमी तर नागपूर आरएसएस आणि फडणवीस यांच्या भेटीगाठीसंदर्भात प्रश्न विचारले. माझ्या ताेंडवून वदवून घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देवेंद्र फडणवीस यांनाच अडकवायचे हाेते असा आराेप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. वळसे पाटील, अजित पवार आणि नांगरे पाटलांची नार्को चाचणी करा, अशी मागणी त्यांनी केली.
सदावर्ते म्हणाले, हा कट तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पाेलीस महासंचालक संजय पांडे, सहपाेलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आखला हाेता. पाेलीस उपायुक्त निलोत्पल यांनी मला रात्री बाेलावले. माझाशी पवारांच्या हल्या संदर्भात चर्चा कमी तर नागपूर आरएसएस आणि फडणवीस यांच्या भेटीगाठीसंदर्भात प्रश्न विचारले.
माझावर दबाव होता. मी नावं घ्यावीत अशा अनुषंगाने माहाेल उभा केला जायचा. या पुढाऱ्यांची बैठक झाली होती. त्याला संजय पांडे उपस्थित होते.
सदावर्ते म्हणाले, विश्वास नांगरे- पाटील आरोपी गुन्हा करतात मात्र पुरावा सोडून जातात. गावदेवी पोलिस ठाण्यातील हार्टडिक्स दोन वर्ष टिकते. नांगरे पाटलांना वाटतयं म्हणून गुन्ह्यात आरोपपत्र दाखल केलं जाऊ शकत नाही. नांगरे पाटलांनी थोडं थांबावे. लवकरत एक अॅफिडेविट दाखल होईल.
पवारांच्या काळात दाऊद मोठा होऊन देशाबाहेर निघून गेला. हा कटच हाेता असा आराेप करून सदावर्ते म्हणाले, वळसे पाटील, अजित दादा हे पवारांचे प्यादे आहेत. पवार हे अतिशय घाणरडे, गलिच्छ राजकारणी आहेत. या कटामागे त्यांचाच हात होता. एका वाहिनीमुळे मी गप्प होतो. त्या वहिनीच्या कार्यक्रमात मला बोलावले जाणार होते. मी तिथे हे बोलणारचं होते. पण बोलाविल नाही म्हणून बोलायचे राहिले.
