महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतदान होत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात प्रमुख लढत होत आहे. यावेळी सत्यजीत तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘आम्ही फक्त निवडणुकांपुरते राजकारण करतो. आम्हाला 100 पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मी अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्षच राहणार असेही त्यांनी सांगितले.
बाळासाहेब थोरातसाहेब आजारी आहेत. त्यांच्या खांद्याला फ्रॅक्चर झालं आहे. डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण बेडरेस्ट सांगितली आहे त्यामुळे त्यांना त्रास देण्याची गरज नाही. ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत. योग्य वेळ आल्यावर त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असे सत्यजीत तांबे म्हणाले.तांबे म्हणाले गेल्या दहा दिवसांत आमच्या कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं आणि अर्धसत्य ठेऊन एकच बाजू मांडली गेली त्यावर सविस्तर निवडणुक झाल्यावर बोलणार आहे.
एकंदरीतच या पाचही जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीचा ऋणानुबंध सामान्य जनतेशी, इथल्या मतदारांशी तयार केला. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणूक एकतर्फी असून सगळ्याच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. ही सर्व मंडळी पक्षीय भेदाभेद विसरून सोबत आहेत त्याचं कारण म्हणजे आम्ही निवडणुकीपुरतं फक्त राजकारण करत असतो निवडणूक झाल्यानंतर परिवारानं नियम कायम पाळलेला आहे. आम्ही सातत्याने सामान्य लोकांच्या कामासाठी राबत असतो कधी त्याच्यामध्ये पक्षीय भेदाभेद ठेवत नाही.
