हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन शिवाजी पार्क दादर येथून करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये सकल हिंदू समाज हा मोठ्या प्रमाणात दादर येथे जमा झाला होता व तिथून एक विराट असा मोर्चा निघाला पुढे या मोर्चात अनेक लोक जमा होऊ लागली यामध्ये भारतीय जनता पक्षाचे व शिंदे गटाचे काही नेते देखील सहभागी झाले. हा मोर्चा काढण्याच प्रमुख कारण म्हणजे लव-जिहाद आणि धर्मांतर याच्या विरोधात कायदा महाराष्ट्रात तयार व्हायला पाहिजे अशी मागणी घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चानंतर मोर्चा संदर्भात प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की शेवटी हा मोर्चा शिवसेना भवन येथूनच काढावा लागला. शिवाजी पार्क व शिवसेना भवन हा सगळा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला होता त्यामुळे या ठिकाणाहून हा मोर्चा काढावा लागला अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली त्या शिवाय ते असं सुद्धा म्हणाले की शिवसेना भवन हिंदूंचं अखेरचं अशास्थान आहे. संजय राऊत असं बोलण्याचा सारखाच प्रयत्न करत असतात त्यातून ते टाळ्या मिळतात व कुठेतरी प्रसिद्धी मिळेल त्यामुळे असे विधान ते करतात मुळात त्यांच्या विधानांना काही अर्थ नसतो किंवा त्यांच्या पक्षासंदर्भातील त्यांनी काही घोषणा केल्यावर त्याची अंमलबजावणी होती का याविषयी ते काही विचार करत नाहीत फक्त प्रसिद्धीसाठी ते विधान करत असतात. त्यांनी हे विधान केलं की हिंदूंना शेवटच अशास्थान कोणते तर ते शिवसेना भवन आणि ठाकरे गट असं जर असेल तर मग ठाकरे गटातून कोणी या मोर्चात सहभागी का झालं नाही? संजय राऊत या मोर्चात का सहभागी झाले नाहीत यावर त्यांनी प्रतिक्रिया द्यावी.
जर शिवसेना भवन हे खरंच हिंदूंसाठी अखेरचा आशास्थान असेल तर त्यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं. राज्यभरात अनेक ठिकाणी हे मोर्चे झालेली आहेत त्यामध्ये हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झालेला होता गेल्या काही वर्षांमध्ये ज्याप्रकारे लव-जिहाद किंवा धर्मांतराच्या घटना घडत असतील यावर कायदे व्हावेत ही मागणी जर अनेक हिंदूंची असेल तर या मागणीला समर्थन द्यायला काहीच हरकत नव्हतं संजय राऊत असो किंवा ठाकरे गटातील इतर नेते त्यांनी या सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला कोणत्याही प्रकारचे समर्थन दर्शविले नाही. मात्र शेवटचे आशास्थान म्हणून त्यांच्याकडे पहावं असं संजय राऊत म्हणतात इतके दिवस हे शेवटचं आशास्थान नेमकं कुठे होतं? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होतो. तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी का होत नाहीयेत किंवा सहभागी लोकांना का भेटत नाहीयेत हे तुम्ही स्पष्ट करावे तुमचे राजकीय मतभेद ज्या लोकांसोबत आहेत अशा लोकांसोबत तुम्ही उभे राहू नका पण या हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी होऊन या मोर्चाला समर्थन देऊन या कायद्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे हे स्पष्ट करा मात्र तस करताना ठाकरे गटातील कोणताही नेता दिसत नाही. जे हिंदू आहेत ते हिंदूच आहेत भाजप, शिंदे गट किंवा ठाकरे गटाचे वेगवेगळे हिंदू असं नाही तुम्ही जर शेवटच अशास्थान आहात तर मग हेही स्पष्ट करा कि पहिलं किंवा दुसरं आशास्थान कोणतं तुमचे नुसते शब्दांचे बुडबुडे असल्याचं तुमच्या विधानांवरून दिसून येतं फक्त बोलायचं व त्यातून प्रसिद्धी मिळवायची याच उद्देशातून संजय राऊत बोलतात.
