शिवसेना नेते अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले. त्या ठिकाणी किरीट सोमय्या जाणार आहेत. याआधी माजी मंत्री अनिल परब यांनी आपली भूमिका मांडली. किरीट सोमय्यांनी मराठी माणसाला या ठिकाणी राहू द्यायचं नाही हे धोरण ठरवत बिल्डरांकडून सुपारी घेतली आहे. किरीट सोमय्या इथे येऊ द्या, आम्ही त्याचं स्वागत आमच्या पद्धतीने करू, कारण मराठी माणसाच्या हिताच्या आड कुणी आलं तर शिवसेना आणि मी गप्प बसणार नाही, असा इशाराच अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना दिला आहे.
आज अनिल परब यांनी जिथं बांधकाम पाडण्यात आलं तिथून पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी किरीट सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्याचबरोबर भाजपचे नेते किरीट सोमय्या अनिल परब यांचे बांधकाम पाडण्यातं आलं तिथ पाहणी करण्यासाठी निघाले होते. बीकेसी पोलिसांनी त्या ठिकाणी जाण्यापासून रोकलं त्यामुळे राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
पत्रकार परिषदेत अनिल परब म्हणाले की, म्हाडा आणि या इमारतीमधील रहिवासी म्हणून बोलत आहे. या इमारतीत माझा जन्म झाला आणि बालपण गेलं. आता या इमारती म्हाडाच्या मालकीच्या राहिलेल्या नाही. सोसायटीची जागा मला वापरायला दिली होती. रहिवांशाच्या विनंतीवरुन जनसंपर्क कार्यालयासाठी सोसायटीची जागा वापरत होतो. परंतु या जागेबाबत काहींनी तक्रारी केली. मी मंत्री झालो तेव्हा किरीट सोमय्या यांनी म्हाडाच्या लोकायुक्तांकडे जाऊन हे कार्यालय अनधिकृत असल्याचं सांगितलं. यावर म्हाडाने मला नोटीस दिली, त्याला मी उत्तर दिलं. ही जागा माझी नाही यासंदर्भात मी स्पष्टीकरण दिलं. मी फक्त जागा वापरत होतो. त्यानंतर म्हाडाने नोटीस मागे घेतली. रहिवासी कोर्टात गेले तेव्हा रेग्युलायझेशनचा अर्ज केला. म्हाडाने मला पत्र दिलं की रेग्युलाईज करता येणार नाही. सरकारी यंत्राणा आणि म्हाडावर किरीट सोमय्यांनी दबाव टाकला.
