राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा काश्मीरमध्ये समारोप झाला आहे.
लाल चौक पर तिरंगा लहराकर
भारत से किया वादा आज पूरा हुआ।
नफ़रत हारेगी, मोहब्बत हमेशा जीतेगी,
भारत में उम्मीदों का नया सवेरा होगा।
श्रीनगर मधील लाल चौकामध्ये तिरंगा फडकवल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून अशाप्रकारे आनंद व्यक्त केला आणि तो स्वाभाविक आहे.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर लाल चौकात जाऊन तिरंगा फडकवणारे राहुल गांधी दुसरेच काँग्रेसचे नेते असतील म्हणजेच नेहरूंच्या नंतर काँग्रेसचा दुसरा नेता तयार व्हायला जवळपास 75 वर्षांचा कालावधी लोटला. यातील जवळपास 70 वर्ष काँग्रेसची सत्ता देशात राहिली आहे मात्र त्यांच्या एका नेत्याला नेहरू नंतर काश्मीरमध्ये जाऊन तिरंगा फडकवण्यासाठी 75 वर्षे लागली यातच सगळं आलं स्वाभाव विकास काँग्रेसच्या एकाही नेत्याला काश्मीरमध्ये जाऊन तिरंगा फडकवण्याची हिंमत झाली नाही नेहरू यांच्यानंतर आपला दुसरा क्रमांक लागला याचा आनंद राहुल गांधी यांना झाला असावा व तो त्यांनी व्यक्त केला असावा. लाल चौकात जाऊन तिरंगा फडकाविण्याचे वचन त्यांनी पूर्ण केले असले तरी त्याचे खरे श्रेय कोणाला जाते, कोणामुळे राहुल गांधी यांना हे शक्य झाले इतक्या वर्षानंतर काँग्रेसचा एखादा नेता तिथे गेला आणि तो कुणाच्या कृपेमुळे गेला हे जाणूनघेणं देखील महत्त्वाचं आहे.
राहुल गांधी आपली भारत जोडो यात्रा यशस्वी झाली म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. पण राहुल गांधी यांना 26 जानेवारी 1992 ही तारीख आठवण्याची गरज आहे. त्यावेळी देशात काँग्रेसचे सरकार होतं तेव्हा भाजपने देशात कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत एकता पदयात्रा काढली होती या यात्रेची जबाबदारी नरेंद्र मोदी यांच्याकडे होती. या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद इतक्या टोकाला गेला होता की लाल चौकात जाऊन तिरंगा फडकाविणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे होते कधी हल्ला होईल याची शास्वती नव्हती हातात तिरंगा घेणे तर सोडाच पण लाल चौकात उभे राहण्याची देखील हिम्मत कोणी करत नव्हतं पण अशा वातावरणातही नरेंद्र मोदी यांनी लाल चौकामध्ये तिरंगा फडकवण्याचा निर्णय घेतला. कोणात हिम्मत असेल तर लाल चौकात तिरंगा फडकवण्यापासून थांबून दाखवा असे खुले आव्हान देखील नरेंद्र मोदी यांनी दिले होते. एकता यात्रेच्या समाप्तीनंतर नरेंद्र मोदी व मुरली मनोहर जोशी यांनी ठरल्याप्रमाणे 26 तारखेला श्रीनगरच्या लाल चौकात पोहोचून तिरंगा फडकाविला तिरंगा फडकाविण्याच्या आधी या परिसरात मोठ्या प्रमाणात गोळीबाराच्या घटना व बॉम्बस्फोटच्या घटना झाल्या तरी देखील मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा फडकाविलाच यानंतर श्रीनगरच्या लाल चौकामध्ये तिरंगा फडकवल्याची देशभर चर्चा झाली तेच नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्याच कार्यकाळात काश्मीरमधील 370 कलम हटवले आहे त्यामुळे काश्मीरचे बदलते रूप आपण पाहत आहोत मोदींच्या त्यावेळच्या एकता यात्रेचा समारोप दहशत्व दहशतवादाच्या वातावरणात यशस्वी झाला तर राहुल गांधी यांच्या यात्रेचा समारोप कलम 370 हटवल्यानंतर दहशत मुक्त वातावरणात झाला.
एकूणच जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवल्याने राहुल गांधी या ठिकाणी मोकळ्या आणि सुरक्षित वातावरणामध्ये तिरंगा फडकू शकले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्वामुळेच काश्मीरमधील नागरिक आज मोकळा श्वास घेऊ शकत आहेत काश्मीरमध्ये तिरंगा तर फडकलाच पण हिंदू उत्सव देखील मोठ्या प्रमाणे साजरे होऊ लागले त्यामुळे राहुल गांधी काश्मीरमध्ये जाऊन तिरंगा फडकवत असतील तर त्याचे श्रेय जाते नरेंद्र मोदी यांनाच ज्या काश्मीरमध्ये राहुल गांधी यांनी आपल्या यात्रेचा शेवट केला याच काश्मीरमध्ये बोलताना भविष्यात राहुल गांधी मोदींचा द्वेष करणार नाहीत कारण नरेंद्र मोदींमुळेच राहुल गांधींनी लाल चौकात तिरंगा फडकाविला आहे.
